चंद्रकांत (आप्पा )थोरात यांचे दुःखद निधन.
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील अकलाई विद्यालयातील कर्मचारी कै. चंद्रकांत (आप्पा) महादेव थोरात(वय 59वर्षें )लोहार गल्ली, अकलूज.यांचे दि. 19/07/2022 रोजी हृदयविकार मुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी,एक मुलगा,तीन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.त्यांचा मुलगा आनंद (बाबा )थोरात यांचा 24जुलै रोजी विठ्ठल मंदिर येथे विवाह होणार होता. ते अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.सकाळी 10-30वाजता अकलाई स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.






