त्या महिलेने ऐकीव माहितीच्या आधारे खा. रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव घेतले -राजेश शिंदे.
अकलूज (प्रतिनिधी )सोलापूर चे भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे बेडरूम मधील एका व्हायरल व्हिडीओ मुळे वादात सापडले होते. एका महिलेने अत्याचार करून फसवणूक केल्याचे आरोप त्यांचेवर केले होते. त्यानंतर त्या महिलेने देशमुख यांचेवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित महिलेने श्रीकांत देशमुख यांचेवर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर तिने पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात पीडित महिलेने प्रसार माध्यमांशी संवाद साधला.पैसे घेऊन मिटवून टाक. असा निरोप इतर व्यक्तींनी आपल्याला दिला. तसेच खासदार निंबाळकर हे सोलापूर ला आहेत. ते तुला भेटायला येणार आहेत. आणि तुझी सही घेणार आहेत. हे ऐकल्यानंतर ती महिला म्हणाली, मी एकटी आहे. मग सही कशी करणार? या व्हिडीओ मध्ये कोठेही असा उल्लेख नाही. की खासदार तिच्याशी बोलले आहेत. अथवा भेटले आहेत. असा कोणताही उल्लेख नाही.*यासंदर्भात संघर्ष योद्धा पोर्टल ला बातमी प्रकाशित करण्यात आली होती.**बातमी प्रकाशित झाल्यानंतर यासंदर्भात खासदार रणजितसिंह नाईक -निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक राजेश शिंदे यांनी संघर्ष योद्धा शी बोलताना सांगितले की, या प्रकरणाशी खा. निंबाळकर यांचा हस्ते -परहस्ते काहीही संबंध नाही. आमचे या संदर्भात त्या महिलेशी कोणतेही संभाषण झालेले नाही. त्या महिलेने ऐकीव माहितीच्या आधारे नाव घेतले आहे.शिवाय खासदार यांनी तिच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधलेला नाही.-राजेश शिंदे.*







