प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र शाखा-करमाळा. यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्या चे 23जुलै रोजी आयोजन-आशाताई चांदणे.
करमाळा (प्रतिनिधी )प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र शाखा-करमाळा. जि. सोलापूर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्या चे आयोजन शनिवार दि.23जुलै रोजी पंचायत समिती सभागृह करमाळा येथे दुपारी 12-35वाजता आयोजित केल्याची माहिती प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या जिल्हा महिलाध्यक्षा सौ. आशाताई चांदणे यांनी दिली.सदर कार्यक्रम करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून,करमाळ्या चे तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, बालविकास प्रकल्प अधिकारी व्ही. डी. माने,यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश (भाऊ )करे -पाटील,ग्राम सुधार समिती चे अध्यक्ष ऍड. डॉ. बाबुराव हिरडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये होणार आहे.सदर कार्यक्रमासाठी डी.टी. आंबेगावे(संस्थापक अध्यक्ष) सुर्यकांत सादलापुरकर(राज्य संपर्क प्रमुख, नांदेड ) श्री.पंडीतजी हणमंते(दे.साहित्य सम्राट मुख्य संपादक ,लातुर) लहुकुमार शिंदे(जिल्हा अध्यक्ष, लातुर),आप्पासाहेब लोखंडे (जिल्हा अध्यक्ष पुणे), .महेश निकत(संस्थापक,ग्लोबल सायन्य इंस्टिट्युट ,करमाळा ),पंकज धायगुडे-पाटील(जिल्हा अध्यक्ष सातारा ),सौ.वैशालीताई पाटील(जिल्हा महिलाध्यक्षा लातुर) कल्याण देहाडे(जिल्हा अध्यक्ष, औरंगाबाद), अँड.सविता ताई शिंदे(अध्यक्षा लोकस्वराज्य प्रतिष्ठान करमाळा ),धनंजय मोरे(पत्रकार दैनिक पुण्यनगरी, सदस्य माढा ता.शि.सल्लागार समिती) अँड. अपर्णाताई पदमाळे(संचालिका पदमाळे क्लासेस, करमाळा )इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यी, पालक व मुख्यध्यापक यांचा सन्मान सोहळा आयोजीत केला आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशातार्ड चांदणे (सोलापूर जिल्हा महिलाध्यक्षा), श्रीमती विजया कर्णवर,(जिल्हा उपाध्यक्षा )श्रीमती प्रमिला जाधव,(जिल्हा सचिव ), बाळासाहेब भिसे (तालुका अध्यक्ष ),आबासाहेब झिंजाडे (जेऊर शहर अध्यक्ष ),दादासाहेब शिंदे (तालुका उपाध्यक्ष ),अक्षय वरकड( तालुका सचिव ),.प्रमोद खराडे(तालुका संपर्क प्रमुख )सौ. माधुरीताई कुंभार (सदस्य )अंगद भांडवलकर(सदस्य) धनंजय पाटील (सदस्य )संजय चांदणे (सदस्य )श्रीमंत दिवटे (सदस्य) इत्यादी परिश्रम घेत आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा महिलाध्यक्षा सौ. आशाताई चांदणे यांनी केले असून सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन केलेआहे .







