*आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नातून नातेपुते नगरपंचायती मधील विकासकामांसाठी ५५ लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध*
मौजे नातेपुते प्रभाग क्रमांक ९ मधील सदाशिव काळे यांच्या मेन रोड रस्ता तयार करने १० लक्ष रूपये.प्रभाग क्रमांक ११ येथील दहिगाव रोड ते सुधाकर राऊत वस्ती रस्ता तयार करणे २० लक्ष रूपये.प्रभाग क्रमांक १४ येथील आझाद चौक ते अक्षय संस्था (शाळा) रस्ता तयार करणे २५ लक्ष रूपये.नातेपुते येथील विकासकामांसाठी ५५ लाखांचा निधी मंजूर झाला असून तसेच आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी नातेपुते नगरपंचायती मधील ३३ विविध विकासकामांना प्रशासकीय व वित्तीय मंजूरी मिळून निधी उपलब्ध व्हावा या करीता.१४ जून २०२२ रोजी सोलापूर जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे मागणी केली होती.







