करमाळा हिवरे कोळगाव मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
करमाळा प्रतिनिधी – हिवरे कोळगावत ह,भ,प, अमोल फरतडे यांच्या येथे गुरुपौर्णिमा खूप उत्साहात साजरी केली व ह,भ,प, गुरुवर्य मच्छिंद्र महाराज लांडगे यांनी प्रवचन व गुरु शिष्याचं नातं कसं असावं हे श्रीकृष्ण व अर्जुनाच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातून समजावून सांगितले व अर्जुनाला समवत द्यायचे होते म्हणजे, त्याच्या परिण शक्ती पात करून द्यायची होती गुरुकृपा ही तीन प्रकारे होती ,एक शब्दाने, दोन नेत्राने, तीन आलिंगन ,आणि जे शिष्याचे कर्म असतं ते सद्गुरु स्वीकारतात व त्या शिष्याला मोकळं करून परम्याच्या स्वरूपाला स्थानपन करतात, हृद्या हृद्य एक झाले या हृद्यचे त्या हृद्यी घातले द्वैत न मोडीताआपण ऐसे केले| या उक्ती प्रमांणे झाले, देव देवच राहिले अर्जुन ही अर्जुनाच राहिले गुरुच्या सानिध्यात सिद्धी रिद्धीनंतर अनेक शक्ती नांदतात असे असतो, गुरु महिमा गुरुपौर्णिमा साजरी करतात, ज्यांनी मला घडवलं, या जीवनात मला जगायल शिकवलं, लढायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा ऋणी बंध आहे,. प्रत्येक व्यक्ती गुरुआसतो खरंतर ज्ञानाची शक्ती शिष्याच्या क्षमतेपेक्षा भिन्न असते. अशी ही शक्ती तडका फडकी एका झटक्यात शिष्यात आली तर शिष्यासाठी ती घातक ठरू शकते, आणि म्हणूनच अशा वेळी गुरुच्या शक्तीची आवश्यकता भासते, कारण ती ज्ञानाला धारण करण्यास सक्षम असते गुरुची शक्ती हळूहळू या तपाला शिष्याच्या क्षमतेनुसार त्याच्यात संचलित करते व यामुळे शेवटी साधक कोणत्याही हानी शिवाय ज्ञानाच्या या शक्तीला धारण करण्यास सक्षम बनतो,अशा या गुरू शिष्याच्या पवित्र ऋण बंधनाच्या म्हणजे ज्या गुरुचा व शिष्याचा एकरूप होतो तेव्हा गुरु शिष्याच्या नात्याला खरा अर्थ असतो म्हणूनच गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करतात








