शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज च्या गुणवंत विद्यार्थी,विद्यार्थीनीचा सत्कार समारंभ सोमवार 18जुलै रोजी स्मृतिभवन येथे होणार
अकलूज (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या एस एस सी य एच एस सी (10वी 12वी) परीक्षेतील शिक्षण प्रसारक मंडळातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनींचा सत्कार समारंभ जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील (मार्गदर्शक संचालक, शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज) यांच्या शुभहस्ते व संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील (अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज) व कु.स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील (संचालिका शिक्षण प्रसारक भंडळ,अकलूज) यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक १८/०७/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स्मृतीभवन शंकरनगर-अकलूज येथे होणार आहे. कला,क्रिडा,सांस्कृतिक आणि बौध्दीक क्षेत्रात शिक्षण प्रसारक मंडळा ने नेहमीच सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. या सर्वच क्षेत्रात संस्थेने राज्य, राष्ट्रीय व देश पातळीवर विशेष ओळख निर्माण केलेली आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था सतत प्रगतीपथावर असून, नेत्रदिपक कामगिरी करत आहे. इ.१०वी च्या परीक्षेमध्ये संस्थेच्या सदाशिवराव माने विद्यालय,अकलूजचा विद्यार्थी चि.णमोकार अनिलकुमार सावळे याने 500पैकी ४८७ गुण व ९७.४० टक्के मिळवून संस्थेत प्रथम क्रमांक प्राप्त केला तर जिजांमाता कन्या प्रशालेची विद्यार्थीनी कु.दिक्षा ज्ञानेश्वर निंबाळकर हिने ५०० पैकी ४८४ गुण व ९६.८० टक्के मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला व श्री बाणलिंग विद्यालय,फोंडशिरसची विद्यार्थीनी कु.अनुजा अमोल ढोपे हिने ५०० पैकी ४८१ गुण व ९६.२० टक्के मिळवीत संस्थेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. संस्कृत विषयात 100पैकी १०० गुण चि.प्रतिक संतोष कदम (सदाशिवराव माने विद्यालय,अकलूज) व कु.दिक्षा ज्ञानेश्वर निंबाळकर (जिजामाता कन्या प्रशाला,अकलूज) यांनी मिळवीले आहेत. सदरच्या सत्कार समारंभात इ.१०वी च्या ९० टक्के व ९० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या ७२ गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच शाखावार प्रथम आलेल्या १७ गुणवंत विद्यार्य्यांचा अशा इ.१०वी च्या एकुण ८९ विद्यार्थ्यांचा आणि इ.१२बी च्या संस्थेत प्रथम आलेल्या ३ गुणवंतांचा व 80 टक्के व 80 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या ३३ विद्यार्थ्यांचा आणि विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केलेल्या ६ विद्यार्थी असे इ.१२वी ‘चे एकूण ४२ गुणवंतांचा अशा इ.१० वी इ.१२ वी एकत्र मिळून एकुण १३१ विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात येणार आहे. इ.१०वी परीक्षेसाठी संस्थेच्या ३३ शाखेतुन ३०५३ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले.त्यापैकी २९५२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शेकडा निकाल ९६.६१ टक्के लागला. यामध्ये विशेष प्राविण्य ९११ , प्रथम श्रेणी ११८७ , द्वितीय श्रेणी ६८४ व पास श्रेणी १७० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संस्थेच्या १५ शाखांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये जिजामाता कन्या प्रशाला अकलूज , श्री विजयसिंह मोहिते विद्यालय वाघोली, श्री जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय संग्रामनगर, प्रतापसिंह मोहिते-पाटील विद्यालय शिवपूरी, श्री पळसेश्वर विद्यालय पळसमंडळ, श्री हनुमान विद्यालय लवंग, श्री विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालय विझारी, श्री शंभु महादेव विद्यालय उंबरे-दहिगांय, श्रीनाथ विद्यालय लोंढे मोहितेवाडी, रामलिंग विद्यालय कुरबावी , कृष्णांनद विद्यामंदीर पाटीलवस्ती,मोहनराव पाटील विद्यालय बोरगांव , अकलाई विद्यालय अकलुज, श्री विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय कोळेगांव व श्री सावतामाळी विद्यालय माळेवाडी या शाखांचा समावेश आहे. इ.12वी च्या परीक्षेकरीता संस्थेच्या ७ शाखेतुन १९५७ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १७२८ उत्तीर्ण होऊन शेकडा निकाल ८८.३३ टक्के लागला. यामध्ये विशेष प्राविण्य ८६ , प्रथम श्रेणी ६७३ , द्वितीय श्रेणी ८७० व पास श्रेणी १०० विद्यार्थ्याचा समावेश आहे. इ.१रवी च्या परीक्षेमध्ये संस्थेत प्रथम तीन आलेले विद्यार्थी विज्ञान शाखेचे असून ते तीनही विद्यार्थी सदाशिवराव माने विद्यालय,अकलुजचे आहेत. यामध्ये कु.रिया जिनेंद्र गांधी हीने 600पैकी ५६२ गुण व ९३.६७ टक्के मिळवीत संस्थेत प्रथम क्रमांक प्राप्त केला तर कु.प्राची बाळासाहेब लावंड हिने ६०० पैकी ५६० गुण व ९३.३३ टक्के मिळवीत द्वितीय क्रमांक आणि कु.राजलक्ष्मी प्रताप माने हिने ६०० पैकी ५५७ गुण व ९२.८३ टक्के गुण प्राप्त करीत संस्थेत्त तृतीय क्रमांक प्राप्त केला. कला विभागात सदाशिवराव माने विद्यालय,अकलूजची कु.शिवश्री अविनाश ढेरे हिने ६०० पैकी ४८६ गुण व ८१.००टक्के प्राप्त करुन प्रथम क्रमांक मिळवीला. तर श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील व ज्यु.कॉलेज नातेपुते येथील कु.डिंपल थानाराम चौधरी हिने 600पेकी ४६४ गुण व ७७.३३ टक्के मिळवीत द्वितीय क्रमांक आणि महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर येथील अश्विनी तायाप्पा शिंदे हिने ६०० पैकी ४५८ गुण व ७६.३२ टक्के मिळवीत तृतीय क्रमांक प्राप्त केला. वाणिज्य विभागात सदाशिवराव माने विद्यालय,अकलूजची कु.दिव्यानी प्रशांत मेहेता हिने ६०० पैकी 522गुण व ८७.७० टक्के मिळवीत प्रथम क्रमांक प्राप्त केला. कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व ज्यु.कॉलेज, सदाशिवनगर येथील कु.आकांक्षा विनोद ढगे हिने ६०० पैकी ५१७ गुण व ८६.१७ टक्के मिळवीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला.शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूजचा चि.हितेश अमित पुंज याने ६०० पैकी ५९३ गुण व ८५.५० टक्के प्राप्त करुन तृतीय क्रमांक मिळवीला. व्यवसाय अभ्यासक्रम विभागात प्रथम आलेले तीनही विद्यार्थी सदाशिवराव माने विद्यालय,अकलूज चे असून यामध्ये कु.पुजा रणजित डांगे हिने ६०० पैकी ५२६ गुण व ८७.३७ टक्के प्राप्त करुन प्रथम क्रमांक मिळवला.तर कु.दुर्गा कृष्णा शिंदे हिने ६०० पैकी ४५८ गुण व ७६.३३ टक्के प्राप्त करुन द्वितीय क्रमांक मिळवीला. चि.विशाल महादेव मदने याने ६०० पैकी ४५६ गुण व ७६.०० टक्के प्राप्त करीत तृतीय क्रमांक मिळ्वीला. कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त करणारे कु.रोहिणी राजेंद्र दुपडे, कु.ज्ञानेश्वरी सोरभ निर्धार, कु.काजल बळीराम मदने, चि.प्रशांत पुंडलिक वळकुंदे (सर्व विद्यार्थी सदाशिवराव माने विद्यालय,अकलूज), पिक उत्पादन व तंत्रज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त करणारे कु.कल्याणी संपत सरगर, कु.ऐश्वर्या युवराज काळे (दोन्ही विद्यार्थी कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय,सदाशिवनगर) पशु विज्ञान व दुग्धव्यवसाय विषयात २०० पैकी २०० गुण प्राप्त करणारी कु.शिवांजली प्रशांत गुळवे, पिकविज्ञान विषयात २०० पैकी 200गुण प्राप्त करणारी कु.रिया जिनेंद्र गांधी, कु.राजलक्ष्मी प्रताप माने, कु.साक्षी संतोष शिंदे (सर्व विद्यार्थी सदाशिवराव माने विद्यालय,अकलूज) यांचा ही सत्कार या कार्यक्रमात होणार आहे. या वेळी सत्कार समन्वय समितीचे प्रमुख व संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील, संचालिका कु.स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, सचिव अभिजित विजयसिंह रणवरे, सहसचिव हर्षवर्धन दिपकराव खराडे-पाटील, मुख्याध्यापक संजय गळीतकर,प्रताप पाटील, सौ.मंजूश्री जैन आदी उपस्थित होते.







