केंद्र सरकार च्या वतीने अन्नधान्य व खाद्य धान्य यावर पाच टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे.याचा निषेध म्हणून 17जुलै रोजी माळशिरस बंद ची हाक
माळशिरस (प्रतिनिधी )
केंद्र सरकार च्या वतीने अन्नधान्य व खाद्य धान्य यावर पाच टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे तरी यासाठी निषेध म्हणून माळशिरस मधील सर्व किराणा व्यापारी व भुसार व्यापारी यांनी दिनांक १७ ०७ २०२२ वार रविवार या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय झाला.
माळशिरस किराणा व्यापारी असोशियन,व भुसार व्यापारी असोशियन यांनी माळशिरस चे तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
अन्नधान्य व खाद्यपदार्थ वस्तूवर केंद्र शासनाकडून ५ टक्के GST लागू होणार असलेचा अंतिम निर्णय GST च्या बैठकीमध्ये घेतला आहे. दि.१३/०७/२०२२ रोजी नोटीफिकेशन काढले असून दि.१८/०७/२०२२ पासून अंमलबजावणी होणार आहे. या GST च्या आकारणी निर्णयामुळे त्याचा परिणाम आपल्या व्यापारावर व शेतकरी व जास्त करून सामान्य नागरिकांवर होणार आहे. यामध्ये अन्नधान्य, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, गरा, पीठ, कड्थान्ये, बेसन या सर्व वस्तूंचा समावेश असल्यामुळे सर्व वस्तू महाग होणार आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईला सामोरे जावे लागणार आहे. अगोदरच गेली २ वर्ष कोरोना महामारीमुळे सर्व सामान्य माणुस महागाईमुळे त्रस्त झालेला आहे. तरी केंद्र शासनाने याचा जरूर विचार करावा. यासाठी दि.१६/०७/२०२२ रोजी देशव्यापी व्यापारी बंद पुकारला आहे. तरी सर्व व्यापाऱ्यानी सदरचा बंद यशस्वी करण्यासाठी माळशिरस शहरातील सर्व किराणा व भुसारा व्यापारांनी दि.१७/०७/२०२२ रोजी बंद पुकारणेचा निर्णय घेतला आहे. तरी सर्व व्यापाऱ्यांनी या बंद मध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन किराणा व्यापारी व भुसार असोशियन चे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी आवाहन केले आहे.









