किरण भांगे यांच्या प्रयत्नाने चाकोरे-अकलूज बससेवा सुरू
अकलूज/प्रतिनिधी:-मौजे चाकोरे-कोंडबावी-आनंदनगर मार्गे अकलूज अशी बससेवा तात्काळ सुरू करावी अशी मागणी ग्रामपंचायत चाकोरे यांच्या पत्राद्वारे किरण भांगे यांनी अकलूज आगारप्रमुख यांच्याकडे केली आहे.कोरोना काळात बंद झालेली एसटी.बससेवा पूर्ववत करण्याची मागणी सदाशिवराव माने विद्यालय व शंकराव मोहिते महाविद्यालयाचे विद्यार्थी-पालक, ग्रामस्थांनी केली होती.परंतु महिना झाला तरी मागणी मान्य झाली नसल्यामुळे अखेर भांगे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.तसेच माळेवाडी कॉलेज समोर विनंती थांबा मंजूर करण्यात आलेला आहे.अखेर भांगे यांच्या प्रयत्नामुळे चाकोरे बससेवा पूर्ववत सुरू झालेली आहे.2017 पासून भांगे हे चाकोरे गावाला एसटी सुरू करण्यासाठी नेहमी तत्पर असतात.








