अकलूज नगर परिषद समोरील यादव कालीन महादेव मंदिराची पडझड.भाविकांच्या जिवाला धोका.पुरातत्व विभागाने दुरुस्ती करावी
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज नगरपरिषद च्या समोर असलेल्या पुरातन महादेव मंदिरावरील काही भागाची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून सदर मंदिर दुरुस्त करणे संदर्भात अकलूज येथील सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांनी 23-3-2022रोजी अकलूज नगरपरिषद कडे निवेदन दिले आहे.सदर निवेदनात पुढे असे सांगितले आहे की,अकलूज नगर परिषद च्या हद्दीत यादव कालीन महादेव मंदिर आहे.या मंदिराच्या वरील भागावरील काँक्रिट पूर्ण खराब झाले असल्याने पावसाळ्यात पाण्याची गळती होऊन माती व मोठ्या दगडी शिळा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच मंदिराचा काही भाग कोसळण्याच्या मार्गांवर आहे.तसेच श्रावण महिन्यात व इतर वेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने देव दर्शनासाठी येत असतात.पूर्वी अकलूज ग्रामपंचायत असताना तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांनी त्याकाळी मंदिराचे काँक्रीटीकरण केले होते.त्यामुळे ते आजपर्यंत टिकून राहिले आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असून तातडीने मंदिराची दुरुस्ती करावी. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.दरम्यान सदर निवेदनाची दखल घेऊन अकलूज नगर परिषदेने 2-6-2022रोजी सोलापूर येथील भारतीय पुरातत्व विभाग चे अधीक्षक यांना पत्र दिले आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असून मंदिराचा काही भाग खराब झाला असून, पावसाळ्यात मंदिरात पाणी जाऊन पाण्यामुळे मंदिराचा काही भाग कोसळून नागरिकांच्या आणि भाविकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.तसेच त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहचू शकते.सदर मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर ये -जा असते.सदर ठिकाणी पडझड झाल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो.त्यामुळे सदरची बाब गांभीर्याने लक्षात घेता मंदिराचा जीर्णोर्धार करणे गरजेचे आहे.सदर मंदिर आपल्या अखत्यारीत येत असल्याने आपण पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.असे पत्र अकलूज नगर परिषद चे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी सोलापूर येथील पुरातत्व विभागाचे अधीक्षक यांना पत्र दिले आहे.









