“शिवामृतची” अशी ही देशसेवा…!
अकलूज/प्रतिनिधी ; भारतीय सैन्याच्या राष्ट्रीय रायफलच्या ४५ व्या बटालियन तर्फे कश्मीर घाटातील माच्छील सेक्टर मधील स्थानिक रहिवाशी लोकांच्या पशुधनासाठी आयोजित व्हेटरनरी कॅम्पसाठी शिवामृत दूध उत्पादक संघा तर्फे जनावरांचे औषधे देण्यात आले.राष्ट्रीय राफल ४५ व्या बटालियन मधील सीओ विनोद कुमार व कॅप्टन देशपांडे यांनी कश्मीर घाटातील लाईन ऑफ कंट्रोल जवळील माच्छील सेक्टर व आसपासच्या रहिवासी यांच्या मेंढी,बकरी,घोडे,गाय जे काही पशुधन असेल त्यांच्याकरिता व्हेटरनरी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.या भारतीय सैन्याने आयोजित केलेल्या कॅम्पसाठी शिवामृतने जनावरांच्या वाढीसाठी, उपचारास आवश्यक असलेली,औषधे देण्यात आली.शिवामृत दूध संघाने अशा ही देशसेवा करत एक आदर्श निर्माण केला आहे.
.*चौकट*
सीमेवर लढणारे भारतीय सैनिक कोणत्याही संकटाची पर्वा न करता, प्राणांची बाजी लावून देशाचे रक्षण करत असतात,देशाच्या रक्षणाच्या कर्तव्या सोबतच तेथील स्थानिक रहिवाशी यांच्या करता सुद्धा सामाजिक जबाबदारीतून विविध उपक्रम राबवत असतात.अशा सैनिकांची प्रत्यक्षपणे अप्रत्यक्ष जे काही जेवढे शक्य होईल तेवढी मदत करण्यासाठी मोहिते-पाटील परीवार सदैव तत्पर असेल.धैर्यशिल मोहिते-पाटील,चेअरमन,शिवामृत दूध संघ.









