*कोडोली (ता.पन्हाळा) येथे प्रदीप पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन* कोल्हापूर दि.13.(प्रतिनिधी) कोडोली (ता.पन्हाळा) येथील श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी व्यवस्थापक (कै.) प्रदीप (बाबा) यशवंत पाटील यांचा नववा स्मृतिदिन रक्तदान शिबिर,व्याख्याने आदी कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. कोडोली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यालयाच्या आवारातील प्रदीप बाबांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने संस्था अध्यक्षा श्रीमती पद्मजादेवी प्रदीप पाटील, सेक्रेटरी डॉ.जयंत पाटील,विश्वस्त सौ.विनिता जयंत पाटील यांनी बाबांच्या स्मृतीला उजाळा देत कौटुंबिक पूजन केले. संस्था कार्यालयाच्या आवारात विविध शाखांच्या,संस्था व नागरिक यांच्या वतीने बाबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय,वासंतीदेवी पाटील फार्मसी कॉलेज यांनी आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. संस्था कार्यालयाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद गोडबोले,डॉ.अभिजित इंगवले,यशवंत प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक लालासाहेब झेंडे यांनी भाषणातून प्रदीप बाबांच्या स्मृतींना उजाळा दिला.यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचे प्रतिज्ञा वाचन केले. यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनी प्रदीप पाटील यांच्या प्रतिमीचे पूजन केले.याप्रसंगी प्रा.डी.डी.पाटील,कार्यालयीन अधीक्षक एस.के.पाटील,वरीष्ठ लिपिक अनिल इंदुलकर आणि सेवक तानाजी मोहिते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डोनोलीच्या इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सचिन जद यांनी केले.किसरूळ हायस्कूलचे मुख्याध्यापक पंडित साळोखे यांनी आभार मानले.








