वेळापूरच्या मोहिते-पाटील विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
संग्रामनगर (केदार लोहकरे याजकडून)वेळापूर येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील विद्यालयात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाचे पर्यवेक्षक चांगदेव चंदनशिव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महर्षि व्यास व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांनी केले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सत्कार केला व सर्वांना वंदन केले.संग्राम पाटील व स्वरदा माने-देशमुख या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. या कार्यक्रमासाठी माध्यमिक विभागाचे शिक्षक प्रतिनिधी नागेश सोनवणे,उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षक प्रतिनिधी सतीश माने-देशमुख, जेष्ठ लिपिक राजेंद्र शिंदे,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भाग्यश्री दरेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक समृद्धी शहा हिने केले, सूत्रसंचालन सुदिक्षा माने-देशमुख व देवयानी सावंत यांनी केले तर सानिया मुलाणी हीने आभार मानले.







