गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुस्साक्षात्परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
दिनांक 13 जुलै 2022 रोजी शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी भेटवस्तू आणल्या होत्या. आक्कासाहेब- काकासाहेब आणि सरस्वतीच्या फोटो पूजनाने कार्यक्रम घेण्यात आला. गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचा इतिहास आणि गुरुचे आपल्या आयुष्यातील स्थान याविषयी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रशालेच्या वतीने सर्व शिक्षकांना गुलाब आणि पेन देऊन सन्मानित करण्यात आलं आणि प्रशालेचे मुख्याध्यापक माने देशमुख सरांनी मुलांना गुरुचे महत्व पटवून दिले व मुलांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छापर मार्गदर्शन केले.








