*श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांची पुण्यतिथी व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न*
संग्रामनगर दि.28 (केदार लोहकरे याजकडून)वेळापूर येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील विद्यालयामध्ये श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांची पुण्यतिथी व दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये 80 % पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव माने-देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. बाळासाहेब साळुंखे,छाया चव्हाण व चांगदेव चंदनशिव यांनी दहावी-बारावीच्या निकालाचे वाचन केले.या कार्यक्रमासाठी प्रशाला समितीचे सभापती सतीशराव माने-देशमुख,अर्धनारी नटेश्वर महाविद्यालयाचे सभापती अमरसिंह माने-देशमुख, सदस्य तुकाराम जगदाळे,चंद्रकांत क्षीरसागर,मोहन पालकर,अस्लम शेख,गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. स्थानिक प्रशाला समितीचे सभापती सतीशराव माने-देशमुख यांनी परीक्षेत उत्तुंग यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विद्यालयाच्या निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवल्याबद्दल शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शंकरराव माने-देशमुख यांनी रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या कार्याला उजाळा दिला तसेच शाळेची शिस्त शैक्षणिक प्रगती याबद्दल समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश साळुंखे यांनी केले.सूत्रसंचालन संदिप शिंदे यांनी केले तर नागेश सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.








