*भाळवणी विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.05%*
भाळवणी दि.17 (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे,यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या मार्च 2022 इयत्ता दहावी या परीक्षेचा न्यू इंग्लिश स्कूल,भाळवणी (ता.पंढरपूर) या विद्यालयाचा निकाल 97.05 %लागला आहे.या परीक्षेसाठी एकूण विद्यालयातून 238 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्या पैकी 231विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विशेष प्रावीण्य 71विद्यार्थी,प्रथम श्रेणी -100 विद्यार्थी,द्वितीयश्रेणी 45 विद्यार्थीविद्यालयातून प्रथम क्रमांक कु.प्रणाली देविदास पासले 95.60%द्वितीय क्रमांक शिवम धनाजी माने 93.80%तृतीय क्रमांक कु.आरती संजय जमदाडे 92.60% वरील सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे स्कूल कमिटी अध्यक्ष संभाजी राजे शिंदे, प्राचार्य एन्.एम्.गायकवाड तसेच सरपंच राजकुमार पाटील,उपसरपंच सविता लोखंडे,ग्राम.सदस्य व सर्व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व ग्रामस्थ तसेच पालकांमधून शिक्षक,विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे.







