*शिक्षकांनी आपली मानसिकता बदलून आपल्या पेशाचा अभिमान बाळगावा-मुख्याध्यापक संजय जगताप*
कोल्हापूर दि.१७ (केदार लोहकरे याजकडून)” विद्यार्थ्यां पुढे आई-वडिलांच्या नंतर शिक्षक हेच त्यांचे आदर्श स्थान असते.त्यामुळे शिक्षकांनी आपली मानसिकता बदलून या शिक्षक पेशाचे पावित्र्य राखावे व प्रत्येक शिक्षकाने आपल्या पेशाचा अभिमान बाळगावा” असे प्रतिपादन येथील हॉवर्ड हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय जगताप यांनी आज येथे बोलताना केले. कोडोली (ता.पन्हाळा) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष सत्र 1 च्या विद्यार्थी-शिक्षकांसाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने शैक्षणिक साधन निर्मिती स्पर्धा आयोजीत केली होती.त्यातील विजेत्या स्पर्धकांना संजय जगताप यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देण्यात आली.त्याचप्रमाणे या विद्यार्थी -शिक्षकांना ऑनलाईन परीक्षेच्या सदिच्छा देण्यात आल्या.तसेच संजय जगताप यांचा सेवानिवृत्तीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील म्हणाले,”कठीण काळातही शिक्षकांनी न डगमगता प्रामाणिकपणे काम करत राहिले पाहिजे.बी.एड.मधील ज्ञान आणि कौशल्यांचा भावी जीवनात उपयोग करून घेतला पाहिजे.” यावेळी सहल विभागाच्यावतीने महाविद्यालयास दिलेल्या भेटवस्तूचा प्राचार्य डॉ.पाटील यांनी स्विकार केला.प्रारंभी राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या तसेच विद्येची आराध्य देवता सरस्वती यांच्या प्रतिमांची पूजा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.याप्रसंगी शिल्पकार संतोष नागवंशी,कला शिक्षीका सुप्रिया काळे-नागवंशी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक.डी.डी.पाटील यांनी प्रास्ताविकात प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.प्रा.श्रीमती जी. के.मुजावर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.संजय गणपती जाधव यांनी आभार मानले.







