पुरंदावडे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी या.बाळासाहेब आत्माराम सुळे पाटील यांची निवड….
पुरंदावडे…दि..17/06/2022 रोजी जेष्ठ नेते मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील व युवकांचे प्रेरणास्थान मा. श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मित्र सहकार पॅनल चे प्रमुख विद्यमान सरपंच मा. श्री. देविदास ढोपे यांच्या नेतृत्वाखाली पुरंदावडे विकास सेवा सोसायटी च्या चेअरमन पदी श्री. बाळासाहेब आत्माराम सुळे -पाटील यांची तर व्हा. चेअरमन पदी दादासो काशिनाथ अर्जुन यांची निवड करण्यात आली. ही निवड निवडणूक निर्णय अधिकारी श्री. जाधव व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. झरे यांनी घोषित केली. यावेळी नूतन संचालक भगवान पिसे, रामचंद्र गोरे, जनार्दन शिंदे, कुंडलिक नाळे, अशोक गरगडे, वसंत ढगे, बाळासाहेब सालगुडे पाटील, वाल्मिक ओवाळ, अंजना बोराटे, आशा पालवे तसेच यावेळी माजी सरपंच प्रताप सालगुडे, माजी सरपंच विष्णू ओवाळ, माजी संचालक अरुण धाईंजे, माजी उपसरपंच पोपट गरगडे, नामदेव बोडरे, माजी उपसरपंच संतोष शिंदे, उपसरपंच कुंडलिक पालवे, सोमनाथ पिसेव आजी ,माजी ग्रामपंचायत सदस्य, पुरंदावडे, सदाशिवनगर ग्रामस्थ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.











