एस एस सी बोर्ड पुणे परीक्षेत टमटम चालकाच्या मुलीने मिळवले घवघवीत यश!
अकलूज येथील व्यंकत्नगर सारख्या झोपडपट्टीत राहणारे श्री सुधीर गजेंद्र काटे हे एम ए इतिहास व ग्रंथपाल परीक्षा पास होऊन ही शासकीय किंवा निमशासकीय नौकरी. न मिळाल्यामुळे नाउमेद न होता आत्मनिर्भर जीवन जगण्यासाठी स्वतः टमटम चालक बनून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असताना ही , त्यांची पत्नी सौ शीला यांनी आपल्या पतीला साथ देण्यासाठी घरगुती शिलाई मशीन चालवून सुखाने संसार करत असतानाच आपल्या मुलाच्या शिक्षणाकडे व्यवस्थित लक्ष देऊन नियमित अभ्यास करून घेतला , या काळात मुलीने घरातील काम करावे असा कोणताही आग्रह धरला नाही , कोरोना चे काळात शाळा बंद असताना ही मोबाईल वरून शैक्षणिक धडे घेऊन मन लाऊन स्वतः ला विद्यार्थी म्हणून अभ्यासात झोकून दिल्या मुळेच कुमारी सुचित्रा सुधीर काटे हिने पहिल्याच प्रयत्नात सेमी इंग्लिश मधे 93%मार्क्स घेऊन घवघवीत यश संपादित केल्या मुळे समाजातून या मुलीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे , सर्व नातेवाईक आप्तेष्ट आणि हितचिंतक मुली सह तिच्या आई वडिलांचे ही कौतुक करत आहेत आमच्या मुलीने आमच्या कष्टाचे सार्थक केले हीच आमच्यासाठी मोठी देणगी आहे असे आनंदाश्रू सह माता पित्यानी आमच्या संघर्ष योद्धा पोर्टल शी बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या कुमारी सुचित्रा हिस भावी प्लॅन बद्दल विचारणा केली असता मी सायन्स ला ऍडमिशन घेणार असून बारावी नंतर वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवणे हे माझे ध्येय असल्याचे सांगितले









