बेवारस माेटार सायकल सापडताच अवघ्या अर्ध्या तासात गाडी मालकाच्या स्वाधीन.मालकाने मानले अकलूज पाेलीसांचे आभार
अकलूज मधील अशोका चौकात गेल्या आठ दिवसापासून ( हिराे सीडी डिलक्स एमएच ४५ एएन ८५५० )या नंबर ची गाडी स्टॅंडवर उभी हाेती.चौकातील दूकानदारानी ही बाब तेथे ड्युटीवर असलेल्या पाेलीसांना सांगितली हाेती. परंतू कूणीतरी मालक येईल व घेवून जाईल किंवा मालक बाहेरगावी गेला असेल या समजूतीने गंभीरतेने मनावर घेतले नव्हते परंतू दिनांक १५ जून २०२२ राेजी ०७।०० वाजता जेव्हा ही बाब पाेलीस मित्र परीवाराचे समन्वयक पाे हवालदार रमेश सूरवसे पाटील यांना समजली त्याचवेळी त्यांच्या पाेलीस मित्र व टीमने माहीती घेतली. गाडीवर धूळ बसलेली हाेती व वायर कापलेले दिसले हाेते तेव्हा ही चाेरी केलेली गाडी असल्याचे समजले.त्यांनी तात्काळ पाेलीस मित्रांची टीम विष्णू आंधळकर,पप्पू आंधळकर,रशीदभाई शेख ,श्रीकांत धनवडे ,विनाेद काळे ,संकेत जाधव ,नंदू कांबळे , व माेैलाभाई यांचेसह तात्काळ टेम्पाे बाेलावून गाडी आहे तशी उचलून पाेलीस स्टेशनला घेवून आले दरम्यान गाडीचे फाेटाे व्हाट्सअप केल्याने गाडी चाेरीचा गून्हा पाेलीस स्टेशनला नाेंद झाला हाेता दरम्यान चाैकशीवरून अकलूज येथील दोशी लॅब चे डाँ दाेशी हे मालक असल्याचे समजले हाेते. डॉ. दोशी यांना तुमची गाडी सापडली असल्याचा निराेप दिल्यानंतर ते तात्काळ पोलीस स्टेशन ला आले.डॉ. दोशी यांना अशाेका चाैकात गाडी मिळाली असे सांगीतल्यावर मी दाेन चार वेळेस चाैकात गेलाे हाेताे परंतू मला दिसली नाही असे सांगितले.दरम्यान गाडी परत मिळवून दिल्याबद्दल त्यांनी अकलूज पाेलीस व पाेलीस मित्रांचे आभार मानले.लवकरच काेर्टाचे आदेश हाेवून गाडी ताब्यात दिली जाईल.










