पाेलीस म्हणून नाेकरी करताना …काय काय वाटतं….एवढं साेपी आहे का नाेकरी ?
भरती झाल्यावर पहील्यांदा सूरूवातीला खूप आनंद, कधी मज्जा वाटली …कधी धावपळ कधी ,गाेंधळ कधी डयूटी .कधी ..बंदाेबस्त तर कधी परेडला उशीर झाला म्हणून अपराधी पणा… मग नाेकरीत प्रत्यक्ष पाेलीस स्टेशनला डयूटी जाँईन …घरापासून लांब म्हणून हूरहूर ,वेळेवर जेवण नाही साेय हाेत नाही म्हणून खूप वाईट वाटतं डयूटी करताना ताण तपासात तणाव अराेपी अटक करायचा म्हणून उगीच परेशान अटक केल्यावर पून्हा तपासात रिकव्हरी अटी नियम मेमाे मेडीकल व सूचना पूर्ततेसाठी ताण चहा पाण्याचं बघावं तर ती वेगळी भीती पून्हा फाेन टॅपींग व्हीडीयाे शूटींगची भीती ..अराेपी पार्टीसाठी साेबत पाेलीस कमी कधी सरकारी गाडीच मिळत नाही …अराेपी रंगेल कधी ईरसाल तर प्रतिष्ठीत ..मग खाजगी गाडी केली तर पून्हा चाैकशीला सामाेरे ही भीती …🍁🍁🍁तपास करताना मदतनीस नसताे ..संगणकावर सगळं एकटयानं करायचा दिवसा डयूटी करून रात्री करायचं किंवा कधी रात्री डयूटी करून दिवसा ..🍁🍁🍁झाेप वेळेवर नाही ..जेवण वेळेवर नाही …तपास वेळेवर करा म्हणून दट्या वेगळाच …जरा उशीर झाला की तपासाचे कागद घेवून वरीष्ठांचे आमंत्रन आहेच …🍁🍁एकाच वेळी अनेक गून्हे व अनेक अर्ज व साेबत व अनेक वारस बेवारस मयताचे तपास करावा लागताे … चाैकशीचे लाेक वेळेवर येत नसतात ताे क्षण वाट बघण्याचा विलक्षण असताे …तरीही खंबीर व गंभीर राहून हंबीरावा प्रमाणे लढाई करावी लागते …तलवार नसताना …अनेक वार झेलावे लागतात ताेंडातून हूकांर न काढता …अनेक हजे-या ,अेाआर ,गैरहज-या,शिक्षा,बदल्या ,मान अपमान,वरीष्टांची दमदाटी बाेलणी मेमाे दंड सहन करून अराेपी व कधी फिर्यादी च्या व आम व लाेकांच्या चांगल्या वाईट भावना व बाेलणी खावून हसावं लागतं …भावना मारून कधी मरून जगावं लागतं 🍁🍁आता खरं सांगा ? यातून पाेलीसाला स्वत;साठी वेळ कूठंय ? घरच्या बायका लेकरांना मायेनं बाेलायाला भावना तरी शिल्लक आहेत का ? आई वडील भाउ बहीण या रक्ताच्या नात्याला बाेलायला वेळ तरी मिळताे ? तरीही आनंदाने बाेलावे लागते ? हा पाेलीसांचा गर्भित त्रास सांगता तरी येताे का ? 🍁🍁गाेड कसे बाेलणार ? किती लाेकांना बाेलणार ? या १२ तासाच्या राेजच्या डयूटीतून …शाररीक गरजा, मानसिक गरजा,भावनिक गरजा,सांस्कारीक गरजा,सामाजीक गरजा,सर्वांची प्रतिष्ठा, मान सन्मान जपता जपता स्वत;साठी जगायचं राहून जातं ? आनंद घ्यायचा राहून जाताे ? मनमाेकळं हसायचं राहून जाताे ? 🍁🍁याच ताणतणावामूळे बीपी,शूगर,मेंटली ईनबँलन्स व हरँशमेंट,पाठीचा ताण मणक्याचे आजार किडणी स्टाेन वैगरे आजार सूरू हाेतात कशीही नाेकरी केली तरी टपका काहीतरी ठेवणारचं, कारण पाेलीस हा माणूस आहे , कमी पडणार कारण ताे सर्वांचे समाधान करू शकणार नाही कारण 🍁🍁त्याची लढाई यां हीत शत्रूशी असते 🍁१) फिर्यादी च्या अपेक्षा ते अराेपीच्षा हक्कापर्यंत 🍁२)दैनंदीन डयूटी बंदाेबस्त ताणतणाव ते दैनंदीन जीवनातील स्वत: व आपला परीवार व नातेवाईक अपेक्षा गरजा🍁३)वरीष्ठा पासून ते मा. काेर्ट ते विधानभवन पर्यंत आदेश सूचना दंड व पूर्तता व उपलब्ध असणारी सरकारी असूविधा 🍁४)गावगूंडापासून ते राजकीय नेते लाेकांपर्यंत अपेक्षा व पूर्तता 🍁५) साेशीयल मिडीया व पत्रकार व आरटीआय लिडर 🍁🍁🍁या तणावातून जिंकलं पाहीजे ….काही हरले त्यांनी जीवन संपवले …काही बिघडले त्यांनी बाई बाटली जवळ केली मन माेकळं करण्यासाठी तिथेही धाेका लूबाडणूक फसवणूक ….काहीनी संयमाने बाजी मारली …सन्मानाने सेवा पूर्ण केली ….सांगायतं एवढंच आहे ….तूमच्या अडचणीत तूमचा परीवार तूमच्या साेबत आहेच परंतू सरकारी लढाईत वकील असेल नसेल नातेवाईक नसेल .. पण एक परीवार कायम तूमची बाजू सत्य बाजू घेवून साेबत राहीलप्रत्येक ठिकाणी … तूमच्या साेबत कायम आहाेत व कायम राहू ..🍁🍁🍁🍁आपली माणसं आपला परीवार.सर्व महाराष्ट्र पाेलीसांना सन्मानाने समर्पित 🙏🙏🙏🙏पाेलीस मित्र परीवार संघ
रमेश सुरवसे पाटील. पोलीस हवालदार. अकलूज पोलीस ठाणे मोबाईल -9890254057







