सर्वसामान्य जनतेला जलद व स्वस्त न्याय मिळणेकरिता कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन होणे गरजेचे.
*केंद्रीय राज्यमंत्री माननीय डॉ लोगनाथन मुरुगन
कोल्हापूर दि 16/6
आज कोल्हापूर दौऱ्यावरती केंद्रीय राज्यमंत्री माननीय डॉ लोगनाथन मुरुगन ( केंद्रीय मस्त्य पशुपालन, डेअरीमंत्रालय सूचना व प्रसारण राज्यमंत्री )आले असता कोल्हापूर खंडपीठ कृती समिती मार्फत सर्किट हाऊस येथे कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापनेचे निवेदन देण्यात आले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ लोगनाथन मुरुगन यांचा खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष Adv गिरीश खडके यांच्या हस्ते श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष Adv गिरीश खडके व ज्येष्ठ विधिज्ञ Adv डॉ संतोष शहा यांनी कोल्हापूर खंडपीठ/सर्किट बेंच मागणी गेली 35 वर्षे प्रलंबित आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई चे मुख्य न्यायमूर्ती माननीय दिपांकर दत्ता यांच्या बरोबर 10 मार्च 2022 रोजी खंडपीठ कृती समिती बरोबर सर्किट बेंच स्थापने बाबत मीटिंग झाली आहे.तसेच
सर्किट बेंच स्थापनेबाबत महाराष्ट्र शासनाने ठराव केलेला आहे, महाराष्ट्र सरकार तर्फे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी सर्किट बेंच स्थापनेबाबत माननीय मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांना पत्र देखील पाठवले, तसेच माननीय मुख्य न्यायमूर्ती यांची प्रत्यक्ष भेट देखील घेतली आहे.
तसेच यावेळी राज्यमंत्री यांना असे सांगण्यात आले की आपण मद्रास हायकोर्ट येथे पंधरा वर्षे वकिली केली आहे सर्वसामान्य पक्षकार, जनतेला न्यायहक्का करीता किती झगडावे लागत आहे याची आपणांस माहिती आहे तरी आपण या विषयी केंद्रीय कायदा मंत्री यांचे कडे पाठपुरावा करावा.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री यांच्याकडून विचारणा करण्यात आली की महाराष्ट्रात उच्च न्यायालय मुंबईचे किती बेंच स्थापन आहेत, तसेच या खंडपीठ मागणीसाठी किती जिल्ह्याचा समावेश आहे यावरती शिष्टमंडळातील डॉ adv संतोष शहा यांनी राज्यमंत्री यांना सर्व माहिती देऊन दिली .
यानंतर केंद्रीय राज्यमंत्री यांनी निवेदनास उत्तर देताना असे प्रतिपादन केले की मी देखील एक वकील आहे मद्रास हायकोर्ट येथे मी वकिली केली आहे, सर्वसामान्य पक्षकारास जलद व स्वस्त न्याय मिळाला पाहिजे याची मला जाणीव आहे. कोल्हापूर येथेमुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच मागणी 6 जिल्हे एकत्र करीत असतील तर लवकरात लवकर सर्किट बेंच स्थापन होणे आवश्यक आहे. केंद्रीय कायदा मंत्री मा किरेन रिजीजू यांचेशी माझे मित्रत्वाचे संबंध आहेत मी आपला सर्किट बेंच मागणी प्रश्नाबाबत केंद्रीय कायदा मंत्री यांचे कडे पाठपुरावा करणार असे आश्वासन दिले.यावेळी भाजप शहर अध्यक्ष श्री राहुल चिक्कोडी उपस्थित होते..तसेच सदर खंडपीठ कृती समिती शिष्ट मंडळात माजी अध्यक्ष Adv प्रकाश मोरे, उपाध्यक्ष Adv सुधीर चव्हाण, सचिव Adv विजयकुमार ताटे देशमुख, Adv संदीप चौगुले, Adv तृप्ती नलवडे, Adv स्वप्नील चिल्ले, Adv वारणा सोनवणे, उपस्थित होते.







