किडनीच्या आजारापेक्षा ताण-तणाव हा भयंकर आजार आहे.पत्रकारांनी तणाव मुक्त रहायला हवे -डाॕ.श्रीकांत देवडीकर.विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी. अकलुज- (प्रतिनिधी )पत्रकार हे समाज घडविण्याचे काम प्रामाणिकपणे करीत असतात.सामाजिक कार्य करत असताना पत्रकारांवर सतत ताण-तणाव असतो.किडनीच्या आजारापेक्षा ताण-तणाव हा भयंकर आजार आहे.पत्रकार स्वस्थ तरच समाज स्वस्थ राहील.त्यासाठी पत्रकारांनी तणावमुक्त राहायला हवे असे प्रांजळ मत अकलुज येथील प्रसिध्द किडनी विकार तज्ञ डाॕ.श्रीकांत देवडीकर यांनी व्यक्त केले.राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे ७८ व्या वाढदिवसाचे औचीत्त्य साधत अकलुज येथिल प्रसिध्द देवडीकर मेडिकल सेंटरच्या वतीने डाॕ.श्रीकांत देवडीकर आणि डॉ.मानसी देवडीकर यांनी पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते.यावेळी वसुंधरा देवडीकर यांचेसह,डाॕ.श्रीकांत देवडीकर ,डॉ.मानसी देवडीकर हे मान्यवर उपस्थित होते.या तपासणी शिबीरामध्ये पुर्ण किडणीची तपासणी,सी.बी.सी.सोनोग्राफी,रक्त,लघवी,रक्तातील साखर,प्रोस्टेडग्रंथी, इ.सी.जी इत्यादी सारख्या महत्वाच्या महागड्या तपासण्या पुर्णपणे मोफत करण्यात आल्या.या तपासणी मध्ये डाॕ.श्रीकांत देवडीकर यांनी पत्रकार ताण-तणावात असल्याचे सांगुन काळजी व्यक्त केली.तसेच पत्रकारांची तपासणी करण्याची ही पहिलीच वेळ असुन, भविष्यात ही अशा प्रकारच्या शिबीरांचे आयोजन करणार असल्याचेही ते म्हणाले.सदर प्रसंगी राष्ट्रवादीच्या तत्कालीन माजी महिला तालुका अध्यक्षा वसुंधरा देवडीकर यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आयुष्यभर केलेले कार्य नेहमीच समाजासाठी दिपस्तंभाची भूमिका पार पाडेल असे आवर्जून सांगितले .त्याचप्रमाणे विजयदादांनी घालुन दिलेल्या “जनसेवा हीच इश सेवा “या ब्रिद वाक्यानुसार आणि आदर्श शिकवणींची शिदोरी सोबत घेवुनच यापुढेही समाजासाठी काम चालुच राहणार आहे.जनतेवर विजयदादांनी नेहमीच कुटुंबाप्रमाणे,मुलाप्रमाणे प्रेम केले असे सांगुन आठवणींना उजाळा दिला.हे तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी डाॕ.मानसी देवडीकर यांनी मोलाची भुमिका पार पाडली,सदर तपासणी करण्यासाठी किरण क्लिनिकल लॅब चे किरण कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले.तसेच हाॕस्पिटल मधील सर्व कर्मचाऱ्यांचे यासाठी सहकार्य लाभले.पत्रकारांच्या वतीने वसुंधरा देवडीकर, डॉ. श्रीकांत देवडीकर, डॉ. मानसी देवडीकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला.हॉस्पिटल च्या वतीने उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.या आरोग्य शिबिरात जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार, भाग्यवंत नायकुडे, राजू लोहकरे, एम. एम. शेख, शशिकांत कडबाने, गणेश जाधव, सागर खरात, शिवाजी पालवे, नागेश लोंढे, विलास गायकवाड, डी. एस. गायकवाड आदी पत्रकारांची तपासणी करण्यात आली.














