*शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चा दहावीचा निकाल ९६.६९ टक्के.* संग्रामनगर दि.१७ (केदार लोहकरे याजकडून) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी च्या परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. येथील शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज या संस्थेतील एकूण ३३ शाखेतून ३०५३ विद्यार्थी परीक्षेला बसले.त्यापैकी २९५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व संस्थेचा निकाल ९६.६९ टक्के लागला.संस्थेच्या ३३ शाखे पैकी १५ शाखांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सदाशिवराव माने विद्यालय अकलूजचा चि.णमोकार अनिल सावळे यांने ५०० पैकी ४८७ गुण व ९७.४० टक्के मिळवीत संस्थेत प्रथम क्रमांक पटकावला तर जिजामाता कन्या प्रशाला अकलुजची कु.दिक्षा ज्ञानेश्वर निंबाळकर हिने ५००पैकी ४८४ गुण ९६.८० टक्के मिळवीत द्वितीय क्रमांक,तर श्री बाणलिंग विद्यालय फोंडशिरसची कु.अनुजा अमोल ढोपे हिने ५००पैकी ४८१ गुण व ९६. २० टक्के मिळवीत तृतीय क्रमांक पटकावला.तसेच चि.प्रतीक संतोष कदम (सदाशिवराव माने विद्यालय अकलूज) व कु.दीक्षा ज्ञानेश्वर निंबाळकर (जिजामाता कन्या प्रशाला अकलुज) या दोघांनी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. संस्थेतील जिजामाता कन्या प्रशाला अकलुज,श्री विजयसिंह मोहिते विद्यालय वाघोली,श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर, प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी,श्री पळसेश्वर विद्यालय पळसमंडळ,श्री हनुमान विद्यालय लवंग,श्री विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय विझोरी,श्री शंभू महादेव विद्यालय उंबरे दहिगाव,श्रीनाथ विद्यालय लोंढे मोहितेवाडी,रामलिंग विद्यालय कुरबावी,कृष्णानंद विद्यामंदिर पाटीलवस्ती,मोहनराव पाटील विद्यालय बोरगाव,अकलाई विद्यालय अकलूज,श्री विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय कोळेगाव,श्री सावतामाळी विद्यालय माळेवाडी या १५ शाखेचा निकाल शंभर टक्के लागला तर मोरजाई विद्यालय मोरोची (९९.४२) गणेश विद्यालय पिंपळनेर (९९.०३) श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नातेपुते (९८.७०), महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर (९८.६२), श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय मांडवे (९८.३१) श्री काळ भैरवनाथ विद्यालय गुरसाळे (९७.७३) बाणलिंग विद्यालय फोंडशिरस (९७.६१), सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय वेळापूर (९७.५२) लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर (९७.५०) संत तुकाराम विद्यालय बोंडले (९७.०६) श्री समर्थ रामदास विद्यामंदिर शिवथर(९६.९७), श्री संभाजी बाबा विद्यालय इस्लामपूर (९६.५५),कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय सदाशिवनगर (९४.४१), सदाशिवराव माने विद्यालय मानकी (९३.१४),श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय कोथरुड (९०.९१), सदाशिवराव माने विद्यालय अकलूज (९०.८१),श्री चक्रेश्वर विद्यालय चाकोरे (९०.२४) रात्र प्रशाला अकलूज (६९.२३) याप्रमाणे ३३ शाखेने यश संपादन केले. या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील,सर्व संचालक,सचिव अभिजित रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील यांचेसह विविध शाखेचे पदाधिकारी,सर्व शाखेचे मुख्याध्यापक आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.









