*वेळापूरच्या मोहिते-पाटील विद्यालयाचे केंद्रात प्रथम तीन क्रमांक*
संग्रामनगर दि.१७ (केदार लोहकरे याजकडून)वेळापूर (ता.माळशिरस) येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल ९७.५२ टक्के लागलेला आहे.या विद्यालयातून एकूण १२१ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी ११८ विद्यार्थी पास झाले तर ३ विद्यार्थी नापास झाले. विद्यालयात व वेळापूर केंद्रात कु.सृष्टी सतीश नवले (९४.६० टक्के) प्रथम,कु.पूर्वा हरिदास चव्हाण ( ९३ टक्के) द्वितीय,कु.प्राजक्ता अरविंद उघडे ( ९३ टक्के)द्वितीय,कु.समीक्षा प्रमोद माने-देशमुख (९२ टक्के) तृतीय अशा प्रकारे यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील,संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील,सचिव अभिजीत रनवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील,सभापती सतीशराव माने-देशमुख,प्रशाला समितीचे सर्व सदस्य,मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.






