भाजपा चे अकलूज शहर अध्यक्ष महादेव कावळे यांच्या वाढदिवसा निमित्त गरीब नागरिकांना घरासाठी पत्रे वाटप
अकलूज (प्रतिनिधी )भाजपा चे अकलूज शहर अध्यक्ष महादेव कावळे यांच्या 4मे या वाढदिवसाचे औचित्य साधून महादेव कावळे यांनी स्वतःच्या खर्चातून घरकुल आणि रमामाता चौक येथील गरीब व गरजू नागरिकांना त्यांच्या घरासाठी पत्रे व अँगल दिले.राजकारणा पेक्षा समाजकारणाला महत्व देऊन त्यांनी आजपर्यंत अनेक विधायक कामे केली आहेत. गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप, तसेच गोरगरीब लोकांना शिधा वाटप असे विविध उपक्रम ते नेहमीच राबवत असतात.पत्रे वाटप करताना अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील,महादेव कावळे, भाजपा चे मुख्तर कोरबू, सचिन शिंदे, भैय्या चंदनशिवे, राहुल गायकवाड,सुवा गायकवाड, संजय खंडागळे, सागर थोरात, तेजस लांडगे, प्रवीण खंडागळे, अवी खंडागळे, अमर खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.










