*महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 151 रक्तदात्यांनी केले रक्तदान.**सामजिक कार्या ची मिळाली पोच पावती – महेश शिंदे*
अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर या ठिकाणी राहत असलेल्या मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मार्फत रक्तदानाचे चे आयोजन केले जाते. यंदा ही रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तब्बल 151 रक्तदात्यांनी रक्तदान करून यांच्या वाढदिवसानिमित्त मैत्री प्रतिष्ठान यांनी सलग तिसऱ्या वर्षी शतकाची हॅट्रिक मारली आहे.यावेळी महेश शिंदे असे म्हणाले की मी केलेल्या समाज कार्याची पोचपावती मला मिळाली.तसेच माझ्यासोबत माझे सामाजिक बंधू व माझे मित्र परिवार आहे तोपर्यंत कधीच विजय मिळवत च जाईल.यावेळी कार्यक्रमासाठी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते माळशिरस चे माजी सरपंच मा.विकास दादा धाईंजे, नॅशनल दलीत मूव्हमेंट फोर जस्टाइस संघटनेचे राज्य सचिव वैभव जी गीते साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस किरन जी साठे साहेब, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य काकासाहेब जाधव,अखिल काँग्रेस कमिटीचे सुधीर जी रस्ते साहेब, अखिल काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ गुळवे ,राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस साजिद भाई सय्यद, बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहर प्रमुख उदय कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अधक्ष अभिजीत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज शहर प्रमुख सुरेशभाऊ गंभीरे,युवा सेने चे युवा नेते भूषणभैया पराडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी भानवसे मॅडम व सर्व सामाजिक संघटनांनी व सर्व पक्षांनी येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मैत्री प्रतिष्ठानचे सहकारी यांनी परिश्रम घेतले.







