टणू येथील छबाबाई शिवलिंग बळते यांचे वयाच्या 102 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन
टणु (प्रतिनिधी )पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील टणू येथील छबाबाई शिवलिंग बळते यांचे वयाच्या 102 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.अकलूज येथील नामांकित डॉक्टर अनिल बळते यांच्या त्या आजी होत्या.त्यांच्या पाठीमागे 5मुली,1मुलगा,सून, जावई,नातसुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्या अतिशय मनमिळावू व धार्मिक स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.







