होमिओपॅथिचे जनक डॉ.सॅम्युअल हॅनिमन क्रिकेट चषक स्पर्धेचे उद्घाटन डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न.
अकलूज दि.28 मे 2022 रोजी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेच्यावतीने डॉ.सॅम्युअल हॅनिमन क्रिकेट चषक स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजय तायडे होते .स्पर्धेसाठी राज्यभरातून 15 क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला होता त्याचबरोबर महिलांच्या क्रिकेट संघाने भाग घेतला. डॉ धवलसिंह मोहिते-पाटील यांनी उद्घाटनपर भाषणात मन व शरीर यांचा समतोल राखण्यासाठी क्रिकेट हा खेळ उत्तम असून डॉक्टरांनी रुग्णांच्या आरोग्याबरोबर स्वतःचे आरोग्यही जपले पाहिजे यासाठी क्रिकेट या खेळासारखा व्यायाम नाही असे सांगत सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अजय तायडे यांनी ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रिकेट स्पर्धेचे योग्य व नेटके नियोजन केल्याबद्दल स्पर्धकांचे कौतुक करत क्रीडा समितीचे सर्वस्वी डॉ.बाळकृष्ण गायकवाड, डॉ.अनिल बळते, डॉ.हर्षवर्धन गायकवाड, डॉ. नितीन कुबेर,डॉ. नागनाथ दगडे पाटील,डॉ. अक्षय वाईकर,डॉ.सपना गांधी,डॉ. मिलिंद हिंगमिरे, डॉ. ज्ञानेश्वर पवार ,डॉ. संजय देशमुख, डॉ. संगीता पाटील यांचे अभिनंदन करत जिल्हा संघटनेला शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे डॉ.एम.के.इनामदार, डॉ.राजीव राणे, डॉ.टी.आर. कदम डॉ. सौ सुनेत्रा जोशी, डॉ.अंजली कदम डॉ. प्रविण पाटील,डॉ.नितीन एकतपुरे,डॉ. रामचंद्र मोहिते, डॉ.संजय गायकवाड ,डॉ. मोहन वाघमोडे डॉ.अरुण बंडगर,डॉ. संगीता पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ.तुषार माने, बाळासाहेब सरगर इ.नी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली .यावेळी सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी प्रास्ताविकात सोलापूर जिल्हा डॉक्टर्स संघटनेच्या कामाची माहिती देत यापुढे क्रीडा विभागाबरोबरच सांस्कृतिक विभागांमध्ये सुद्धा जिल्हा संघटना चांगल्या पद्धतीने काम करणार असून जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी यामध्ये हिरारीने भाग घ्यावा असे सांगत आज पर्यंत ही संघटना मार्गदर्शक डॉ. अरुण भस्मे व संस्थापक डॉ. सुनील वरळे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वाटचाल करत असून संघटनेला वीस वर्षे पूर्ण होत असून यापुढेही सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर संघटना चांगल्या पद्धतीने काम करणार असल्याचे सांगितले .संघटनेने आजपर्यंत बरीच आंदोलने केली असून होमिओपॅथिक डॉक्टरांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेने नेहमीच पुढाकार घेतला असून या वेळेस क्रिकेटचे आयोजन करून क्रीडा विभागांमध्ये सुद्धा संघटना मागे नसल्याचे दाखवून दिले. या स्पर्धेसाठी राज्यभरातून आलेल्या सर्व संघांचे त्यांनी आभार व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या व भविष्यामध्ये राज्यस्तरीय सामने जिल्हा संघटनेच्या वतीने भरविण्यात येणार आहेत असे सांगितले . आज पहिल्या दिवशी दहा संघानी सामने खेळले असून महिलांच्या संघामध्ये माळशिरस तालुका डॉक्टर्स संघटनेचा पहिला नंबर आलेला असून दुसऱ्या क्रमांकावर पंढरपूर तालुका डॉक्टर संघटनेचा संघ विजयी झाला आहे. माळशिरस तालुका डॉक्टर्स संघटनेच्या कर्णधार डॉ.सपनागांधी,उपकर्णधार डॉ.स्वाती पोफळे,डॉ.प्रीती पिसाळ, डॉ. छाया दगडे ,डॉ. शुभांगी माने देशमुख , डॉ.उर्मिला पाटील, डॉ. योगिता पोखरे ,डॉ. मेघा गायकवाड ,डॉ. आयेशा मुजावर, डॉ.उमा जोशी ,डॉ. रूपाली धाईंजे, डॉ.स्वाती निंबाळकर तर उपविजेत्या पंढरपूर संघाच्या कर्णधार डॉ. संगीता पाटील ,डॉ.मृदला तळेकर, अर्चना शेडगे, स्नेहल कदम,शितिजा कदम पाटील, जयश्री शिनगारे, स्वाती रणवरे, सीमा राका, दीपाली बेनारे, साधना मोरे,तृप्ती फडे इ.महिला खेळाडूंनी यांनी भाग घेतला.पुरुषांमध्ये पुणे ,बारामती ,सोलापूर सांगोला या संघाने पहिल्या दिवसाच्या सामन्यांमध्ये विजेतेपद मिळवले आहे.संघटनेचे सचिव डॉ.संजय देशमुख,सदस्य डॉ. शिवाजीराव काळे, डॉ. योगेश घोगरे पाटील, डॉ. संगिता पाटील, रमेश सिद, डॉ.पृथ्वीराज माने पाटील, तालुकाध्यक्ष डॉ अभिजीत राजे भोसले, डॉ. ज्ञानेश्वर पवार, डॉ. तुषार जगताप ,डॉ. तुकाराम गावडे ,डॉ.सुधाकर कांबळे, डॉ. अमोल भगत ,डॉ.सुनिल गांधी, डॉ. अभिजित डोके पाटील, डॉ. निखिल गांधी, डॉ. सिद्धराज कदम, डॉ. मिलिंद हिंगमिरे, डॉ. विकास स्वामी, डॉ.किरण बोधले महाराज, डॉ.उदयसिंह जाधव,डॉ. संग्राम कीलमिसे यांची प्रमुख उपस्थिती होती..कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा समितीचे डॉ. अनिल बलते, डॉ. हर्षवर्धन गायकवाड, डॉ. नितीन कुबेर, डॉ. नागनाथ दगडे, डॉ. अक्षय वाईकर, डॉ. सपना गांधी डॉ. फैजल सय्यद इ. मेहनत घेत आहेत..
















