संग्रामनगर येथील मुला- मुलींना नाजिराह-ए- कुरआन ची सनद प्रदान
माळीनगर –हुसेन मुलाणी संग्रामनगर ता.माळशिरस येथील अल् फत्हा सुन्नी मस्जिद व अरबी मदरसा ,तांबोळी आत्तार वसाहत वक्फ संग्रामनगर येथील रहिवासी असलेले व शालेय शिक्षणा बरोबर आध्यात्मिक शिक्षण घेऊन नाजिरा -ए – कुरआन (कुरआन पठण करण्यास शिकलेल्या ) पूर्ण केलेल्या ८ मुली व ७ मुले यांना कुरआन पठण चा कोर्स पूर्ण केल्याने त्यांचा सन्मान करुन त्यांना नाजिराह -ए- कुरआन हे प्रमाण पञ (सनद )मौलाना जाकिर हुसेन साहब मौलाना कमरे आलम मिस्बाही मौलाना अब्दुल वाहिद अमजदी,मौलाना रुबाब हाफीज व कारी रफिक साहब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले मुलांमध्येफारुख सलीम शेख , जाहेद अकबर शेख ,सकलेन अब्दुल रहीम तांबोळी ,जाहेद राजू शेख, शोहेब हमीद मुलाणी ,रेहान आमीर बागवान , जैद आलम शेख तर मुलींमध्ये रुबिया अकील आत्तार , दिया राजू शेख ,अलिशा परवेज शेख , सोफिया हमीद मुलाणी , महेक खलील बागवान, आलिया फिरोज तांबोळी , सोफिया जमाल तांबोळी , इन्तिजा बाबुखाँ पठाण यांना सनद देऊन गौरविण्यात आलेहा सनद प्रदान कार्यक्रम चे आयोजन व हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्या करिता अल् फत्हा मस्जिद चे संस्थापक ,अध्यक्ष हाजी आदमभाई तांबोळी , अल फत्हा मस्जिद चे अध्यक्ष शौकत अबुलाल तांबोळी , उपाध्यक्ष हमीद मुलाणी ,अकबर भाई तांबोळी , पठाण बाबा कमेटी चे अध्यक्ष अजीमभाई तांबोळी , खजिनदार ,अब्दुल तांबोळी , करीम बागवान तसेच पठाणबाबा कमेटी व अल् फत्हा मस्जिद चे सर्व पदाधिकारी , सदस्य व तांबोळी आतार वसाहत संग्रामनगर च्या सर्व युवकांनी परिश्रम घेतले सुञसंचलन व आभार प्रदर्शन शौकत तांबोळी यांनी केले












