*गणपती फार्मसी मध्ये जीपॅट विषयी वेबिनार संपन्न*
अकोले खुर्द, ता. माढा येथील गणपती औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये बी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांसाठी जीपॅट या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेच्या तयारीसाठी “हाव टू क्रॅक जीपॅट एक्साम” या विषयावर वेबिनर चे आयोजन केले असल्याची माहिती प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी दिली.या वेबिनर साठी फार्मास्टार अकॅडमी नांदेड चे डायरेक्टर व प्रोफेशनल जीपॅट टीचर विजयकुमार चाकोते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी या वेबिनारसाठी उपस्थित होते. विजयकुमार चाकोते यांनी जीपॅट या परिक्षेसाठी पात्रता, परीक्षेचे मुख्य विषय, मार्किंग स्किम, परीक्षा पास झाल्यानंतर मिळणारी शिष्यवृत्ती आणि परिक्षेसाठी करावी लागणारी तयारी याचे सखोल मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष अँड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे यांनी कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी महाविद्यालयाचे सचिव डॉ रविद्र बेंदगुडे यांनी जीपॅट या परिक्षेच्या तयारीसाठी महाविद्यालयामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली. कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. सुकुमार लांडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रा. महादेवी भोसले, प्रा. प्रशांत मिसाळ प्रा. रोहिणी गुटाळ, प्रा. शिवराज ढगे, उपस्थित होते.












