सोलापूर येथे भाजपा ओबीसी संपर्क अभियान
सोलापूर (प्रतिनिधी)सोलापूर भाजपा ओबीसी संपर्क अभियान मध्ये भाजपा नेते विजयकुमार देशमुख जिल्हा अध्यक्ष ओबीसी मोर्चा विवेक पंढरपूर तालुकाध्यक्ष ओबीसी मोर्चा भूषण आर पांडुरंग तसेच माळशिरस तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्ष शंकराव काकुळे उपाध्यक्ष साईराम साळुंखे-पाटील बाळासाहेब फुले माळेवाडी माजी उपसरपंच राहुल नारायण फुले अकलूज मल्हारी भगवान बनकर उपसरपंच वेळापूर अजय निशिकांत शिंदे संघटक माढा तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष तसेच नरेंद्र कावे, पंढरपूर निलेश वनारे, पप्पू वनारे किशोर जाधव ,माउली जाधव ,गुलाब सेठ जाधव सागर जाधव, प्रशांत वनारे ओबीसी मोर्चाचे संघटक संघटक पदाधिकारी तसेच सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी मोर्चाचे सर्व पदाधिकारी संघटक कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण लागू केले पाहिजे. ओबीसीच्या 350 जातीचा समूह असून सर्वांनी एकत्रपणे लढा दिला पाहिजे. संघटीत राहून संघर्ष करण्याची वेळ आली आहे. परिवर्तन घडवायचे असेल तर आता वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजी फडवणीस यांनी जो ओबीसीसाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.याला आपण सर्व ओबीसी संघटनेने पाठिंबा दिला पाहिजे त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.दिनांक 25 रोजी मंत्रालयावर ओबीसीसाठी मोर्चा आहे यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे संदीप जाधव राम वाक्षे तुकाराम साळुंखे पाटील या सर्वांनी मनोगत व्यक्त केले














