इंडियन मेडिकल असोशीयेशन अकलूज आयोजित जग प्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा 29मे रोजी स्मृतीभवन च्या बादशाही रंगमंचावर जादूचे प्रयोग.
अकलूज (प्रतिनिधी )82वर्षे,27देश,15800पेक्षाही अधिक प्रयोग सादर करणाऱ्या भारतीय जादू विश्वातील तिसरी पिढी अर्थात प्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर हे लॉकडाऊननंतर आता संपूर्ण कुटुंबासाठी नवीन जादूचे प्रयोग सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत.अकलूज येथील स्मृती भवन च्या बादशाही रंगमंचावर रविवार, दि. 29मे रोजी सायंकाळी सात वाजता जादूचा प्रयोग होणार आहे. त्यामुळे अकलूजकरांची अनेक वर्षाची प्रतीक्षा संपणार आहे.सुमारे अडीच तासांच्या या प्रयोगामध्ये सुमधुर संगीत, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, इजिप्शियन, अमेरिकन, जापनीज, अरेबिक जादूचे चित्तथरारक प्रयोग पाहता येणार आहेत. अकलूज मधील या प्रयोगाचा प्रेक्षकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जितेंद्र रघुवीर आणि संयोजक आय. एम. ए. अकलूज चे अध्यक्ष डॉ. संतोष खडतरे यांनी केले आहे.ह्या शो मध्ये प्रामुख्याने नवीन पद्धतीने माणसाचे दोन तुकडे करून परत जोडणे, मायक्रोवेव्ह मॅजिक, रिंग ओ मॅजिक ,स्वॉर्ड पॅबिनेट , तसेच इतर अनेक नवीन जादू तसेच शून्यातून विश्वनिर्मिती, आर्म इल्युजन, हुदिनी बॉक्स, टय़ूब झ्याक, प्रेक्षकातील मुलगी हवेत अधांतरी, नोटांचा पाऊस, स्टेजवरचा माणूस क्षणार्धात गायब,मास्टर ऑफ प्रेडिक्शन असे एक से एक बढकर श्वास रोखून धरायला लावणारे असे प्रयोग बघायला मिळतील. सप्तरंगी स्वप्नं सृष्टी सोबत हवेतून उडत येणारी चेटकीण आणि भुताचा नाच हे पण एक खास आकर्षण ह्या शो मध्ये पहावयास मिळेल. 2.5 तासाचा जादूचा प्रयोग सुमधुर संगीत ,नेत्रदीपक लाइटस ,आकर्षक वेशभूषा आणि 50 इजिप्सियन, अमेरीकन, जापनीज , अरेबिक जादूचे चित्तथरारक प्रयोग या वेळेस अनुभवता येतील. रघुवीर कुटुंबियांच्या ह्या 4 पिढय़ा आणि 82वर्षाच्या जादू आणि रंगभूमी वरील योगदानासाठी रघुवीर यांना कला तीर्थ पुरस्कार आणि कला गौरव,बालगंधर्व पुरस्कार ,भारतीय जादूगार परिषद , ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट ,अमेरिकन नेव्ही ,युनाइटेड नेशन्स तसेच अखिल मराठी नाटय़परिषद यांनी ह्या शो ला सन्मानित केले आहे. .तरी जास्तीत जास्त उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटावा असे आवाहन संयोजक डॉ. संतोष खडतरे यांनी केले आहे.सदर प्रयोगाच्या तिकीट 200,,400,500,600असून तिकीट खरेदी साठी श्री, अभिजित (आय. एम. ए. ब्लड बँक,9923058027),डॉ. सुजित गांधी (9765788333),डॉ. संजय सिद (9922970416),डॉ. निनाद फडे (9960002727),डॉ. सुनील नरुटे (9920442625),डॉ. रेवती राणे (8888869522),डॉ. प्रिया कदम (9881360910), डॉ. संभाजी राऊत (9011588708),डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे (9823589522).यांच्याशी संपर्क साधावा.















