*डॉ.नंदकुमार देवडीकर यांचे पुण्यतिथी निमित्त देवडीकर हॉस्पिटल च्या वतीने व्याख्यानाचे आयोजन.*






अकलूज: (प्रतिनिधी )वैद्यकीय व्यवसायाचा उपयोग व्यवसायासाठी कमी आणि समाजसेवेसाठी अधिक करणारे सोलापूर जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर कै.डॉ.नंदकुमार देवडीकर यांच्या 18व्या पुण्यतिथी निमित्त अकलूजमध्ये जग प्रसिद्ध व्याख्याते डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे स्थूलत्व व मधूमेह मुक्त भारत आभियान अंतर्गत व्याख्यान संपन्न झाले.तत्पूर्वी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली.यावेळी डॉटर्स मॉम फाउंडेशनच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील,डॉ.एम. के.इनामदार,वसुंधरा देवडीकर,डॉ.श्रीकांत देवडीकर,डॉ.मानसी देवडीकर, डॉ.सतीश दोषी,डॉ.विवेक गुजर,डॉ.संतोष खडतरे , डॉ. संजय सिद, डॉ.नितीन राणे, डॉ. श्रध्दा जवंजाळ,डॉ.वैष्णवी शेटे,डॉ. सुनील राऊत आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना डॉ. दीक्षित यांनी वजन कमी करणे, पोटाचा घेर कमी करणे,जास्त खाण्याचे दुष्परिणाम आदी विषयावर विस्तृत माहिती दिली.. तर तीन वेळा खाणे हे अनैसर्गिक असल्याचे सांगितले.तर उपासाचे कर्क रोगातील महत्व,इन्सुलिनची रक्तातील पातळी वाढल्यास काय होते हे सांगितले.सदरचे व्याख्यान दिनांक 21 मे रोजी पाटीदार भवन बायपास रोड, येथे सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आले होते. डॉ. जगन्नाथ दीक्षित व त्यांच्या सहकाऱ्यांनी २०१३ पासून “स्थूलत्व व मधुमेह मुक्त विश्व” अभियान सुरु केले आहे. या अभियानात ४१ देशातील लाखो लोक सहभागी झालेले आहेत. संपूर्णपणे विनामूल्य असलेले हे अभियान देशात आणि परदेशातही अतिशय लोकप्रिय झाले आहे.या अभियानाची, जीवनशैलीची, त्यात मिळालेल्या यशाची आणि पुढील शक्यतांची माहिती समस्त नागरिकांपर्यंत पोहोचवावी या उद्दिष्टाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.२०१८ मध्ये या अभियानाचे ध्येय गाठण्यासाठी असोसिएशन फॉर डायबेटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल अर्थात ‘अडोर’ या धर्मादाय संस्थेची स्थापना पुण्यात करण्यात आली. आज अडोर तर्फे देशात १३ शहरात मधुमेह मुक्ती केंद्रे आणि २१ ठिकाणी डॉ दीक्षित जीवनशैली विनामूल्य सल्ला केंद्रे चालवली जातात. या केंद्रांचा फायदा आजवर हजारो रुग्णांनी घेतला आहे.यावेळी डॉ. मानसी देवडीकर यांनी मनोगत व्यक्त केले तर डॉ.श्रीकांत देवडीकर यांनी प्रास्ताविक केले.*काय आहे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा डायट प्लॅन?.*वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आजकाल जितकी मेहनत घेतली जाते. तितकी इतर कोणत्याच बाबतीत घेतली जात नाही. हल्ली आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे इतके डाएट्स आहेत की, नेमका योग्य डाएट कोणता हेच आपल्याला कळत नाही. पण या सगळ्या विश्वासार्ह डाएटमध्ये जगप्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांचा डाएट प्लॅन येतो. या डाएट प्लॅनबद्दलही अनेकांना शंका आहेत. म्हणजे नेमकं काय करायचं? याचा फायदा कसा होतो? साधारण किती दिवस हा डाएट करायचा असतो. हा डाएट स्वत: करुन पाहिल्यानंतर याचा फायदा काय होतो. हे आपणाला निश्चितपणे समजेल.शरीराचे कोणतेही हाल न करता,अगदी नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करणारा असा डॉ. जगन्नाथ दीक्षितांचा डाएट प्लॅन आहे. या डाएटनुसार वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दिवसातून केवळ दोनदाच आहार घ्यायचा आहे. या आहारात तुम्हाला काहीही खाता येईल. पण यामध्ये प्रोटीन्सचा अधिक समावेश असावा. कार्बोहायड्रेटचे प्रमाण यामध्ये फारच कमी असायला हवे. आता तुम्हाला दोन वेळाच खायचे आहे म्हटल्यावर त्यासाठी तुम्हाला तो आहार घेण्याची योग्य वेळही माहीत हवी. रोज दोन वेळा तुम्ही ठरवलेल्या वेळी तुम्हाला बरोबर 55मिनिटांमध्ये तुमचा आहार घ्यायचा आहे. साधारण तीन महिने तरी हा डाएट तुम्हाला करायचा आहे. यामुळे तुमचे 8 किलो वजन कमी होईल असे सांगितले जाते. तुमच्या उत्तम आरोग्यासाठी तुमचे वजन योग्यप्रमाणात कमी झालेले फारच चांगले असते. *वजनासोबत मधुमेह देखील हा प्लॅन नियंत्रणात आणतो .*दीक्षितांचा डाएट खूपच फायदेशीर आहे याचे कारण असे की, हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे फार कमी वयात मधुमेहाचा त्रासही अनेकांना होत आहे. याचे कारण आहे वजनवाढीला कारणीभूत चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि वेळा. हीच गोष्ट योग्य करण्याचे काम दीक्षित डाएट करते. दिवसातून केवळ दोनदा आहार घेतल्यामुळे तुमचे अन्न पचण्यास मदत होते. तुमची पचनशक्ती सुधारली तर तुमच्या शरीरात फॅट साचून राहात नाही. तुमचे खाल्लेले अन्न तुम्हाला उर्जा देण्याचे काम करते.वाढते वजन, भूक आणि मेटाबॉलिजम नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त आहे.8 किलो वजन कमी होईल या आशेने अनेक जण लगेचच दीक्षित डाएट करण्याचा विचार करतात. पण डाएट सुरु करण्याआधी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी माहीत हव्यात. तुम्ही खात असलेले पदार्थ हे चांगले असायला हवेत. दीक्षित डाएटमध्ये तुम्हाला खाण्यावर कोणतेही निर्बंध ठेवण्यात आलेले नाही.तुम्ही काहीही कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ खाऊ शकता पण त्या 55 मिनिटांमध्येच. त्यानंतर अगदी एक सेंकदही पुढे तुम्हाला काहीही खाता येत नाही. सकाळी चांगला भरपूर नाश्ता करा. पोहे, उपमा, इडली,थालिपीठ, शिरा, साबुदाणा खिचडी, कॉफी,चहा, ज्यूस जे तुम्हाला आवडतं आणि पोट भरीचं वाटतं ते खा. या शिवाय तुम्ही अंडी खाल्ली तरी चालू शकेल. तुमच्या आहारात भरपूर फळं, भाज्या यांचा समावेश असू द्या. जर तुम्ही संध्याकाळी साधारण 8 वाजता जेवणार असाल तर तुमच्या आहारात योग्य गोष्टी असू द्या.घरी बनवले जाणारे जास्तीत जास्त पदार्थांचे सेवन करा. दीक्षित डाएटमध्ये तुम्हाला पाणीपुरी, शेवपुरी किंवा कोणतेही पदार्थ खाण्यास सांगितले जाते. पण तुम्ही 55 मिनिटांचे विभाजन तुम्हाला हवे तसे करु शकत नाही. तुम्ही हा आहार सलग घ्यायला हवा. आता 55 मिनिटे सलग खाल्ल्यानंतर आणि दिवसातून दोनदा खाल्लायंतर तुम्ही काहीही खाऊ शकत नाही असे नाही तर तुम्ही या काळात ज्यूस, ताक, पाणी यांचे सेवन करु शकता. पहिले काही दिवस तुम्हाला थोडा त्रास होईल. म्हणजे उगाच सतत काहीतरी खावेसे वाटेल. पण काही दिवसांनी तुम्हाला याची सवय होईल. या डाएटचे उद्देश तुमचे इन्सुलिन नियंत्रणात ठेवणे आहे. शिवाय तुमच्या अन्न पचनाचे काम सुरळीत करणे आहे. तुमची पचनक्रिया सुधारल्यामुळे तुम्हाला त्रासही होत नाही. याकालावधीत तुम्ही थोडा व्यायाम केला कर तुमच्यासाठी फारच चांगले आहे. कारण तुम्ही करत असलेल्या डाएटला योग्य पद्धतीने न्याय मिळेल. तुम्ही जीमला जात असाल तर जीमला जाण्याआधी ब्लॅक कॉफी प्यायली तरी चालेल. आपले शरीर चांगले, सुदृढ, निरोगी हवे असेल तर दीक्षित डायट प्लॅन नक्की करुन पाहा. चांगल्या गोष्टींचे सेवन करा तुम्हाला या डाएटचा निश्चितपणे फायदा होईल.














