• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home Uncategorized

अबब…! पंजाबी बिटल ‘शेरू’ बोकडाची किंमत चक्क 52 हजार !

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
May 23, 2022
in Uncategorized
0
अबब…! पंजाबी बिटल ‘शेरू’ बोकडाची किंमत चक्क 52 हजार !
0
SHARES
251
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अबब…! पंजाबी बिटल ‘शेरू’ बोकडाची किंमत चक्क 52 हजार !

अकलूज (गणेश जाधव )वय अवघे आठ महिने.वजन 52 किलो.उंची 36इंच.आयवाजी रोमन नाक.लांब कान.पायात डबल हाड. रुंद छाती.,भरपूर लांबी व आकर्षक गळ्याची झालर.अस रूबाबदार वर्णन आहे शिंदे गोट फार्म शेळमकर वस्ती आनंदनगर-अकलुज मधील एका शेरु नावाच्या बोकडाचं. त्यान नुकतीच 50 हजारांपेक्षा जास्त किंमत मिळवली. सदर बोकड बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पाथर्डी येथील मेजर ऋषीकेश भवर यांनी नुकताच खरेदी केला .

बदलते हवामान व नैसर्गिक आपत्तीमुळे पारंपारिक शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायाकडे वळणे गरजेचे झाले आहे‌. यामुळे अनेक शेतकऱी कुकुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत.परंतु हे व्यवसायही सध्या अडचणीत आले असल्याने आणखी पर्याय शोधणे आवश्यक झाल्याने माळशिरस तालुक्यातील अकलुज (आनंदनगर)च्या तरुणांनी पारंपारीक शेळी पालनाबरोबरच  पंजाबी बिटल जातीच्या शेळ्यांचे आपल्या फार्ममध्ये पालन केले‌ आहे . आज त्या शेळीच्या केवळ 8 महिन्याच्या नरास 50 हजारापेक्षा जास्त किंमत मिळाली आहे.
आनंदनगर-अकलूज येथील शेती व्यवसाय करणारे शिंदे-शेळमकर कुटुंब. बागायती शेती बरोबरच शेळीपालन चालू होते.परंतु यात काहीतरी नवीन करण्याचे शिंदे बंधूंनी ठरविले. पुण्यात बांधकाम अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या शुभम शिंदे यांनी इंटरनेट. सोशल मीडिया चा आधार घेत शेळीपालनात काहीतरी नविन आधुनिक करण्यासाठी अभ्यास केला. त्यात त्यांना पंजाब येथील बिटल जातीच्या शेळीबाबत माहिती मिळाली. सुमारे पाच वर्षांपूर्वी त्यांनी सुरवातीला चार शेळ्या पंजाब येथुन विकत आणल्या. साहजिकच पंजाब व महाराष्ट्रातील वातावरणात बदल असल्यामुळे इथे त्या टिकतील का? याबाबत साशंकता होती. पहिल्यांदा या शेळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळें आर्थिक नुकसान झाले. परंतू जिद्द न सोडता त्यांनी या शेळ्यांच्या खान्यापिण्याच्या सवयी, कोणते अन्न द्यावे, लसीकरण कधी व कसे करावे याबाबत अभ्यासपूर्ण माहिती मिळवली. चिकाटी, सातत्य व कष्टाच्या जोरावर या शेळ्या वाढविल्या. तसेच उस्मानाबादी शेळीला बिटल बोकड क्राॅस करुन येणा‌र्‍या पिल्लांमध्ये आकर्षक वजन वाढ मिळाली.या गोट फार्मवर शेळ्या विक्री बरोबरच बंधिस्त शेळी पालना संबंधी मोफत मार्गदर्शन ही केले जाते.
यासंदर्भात अधिक माहिती देताना शुभम शिंदे यांनी सांगितले की,पंजाब राज्यात आढळणा-या बीटल या जातीच्या शेळीची मागणी महाराष्ट्रमध्ये वाढली आहे. शेळीची मागणी वाढली असली तरी मोठ्या प्रमाणात पुरवठ्याची कमतरता आहे. बीटल शेळी ही मांस व दुधासाठी चांगली असल्यामुळे यातून दुहेरी हेतु साधला जातो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी बीटल शेळी पाळली जात आहे. यातुन उत्पादन चांगल मिळत असल्यामुळे अनेक शेळीपालक बीटल शेळी विकण्यास नकार देत आहेत. काही ठिकाणी या शेळीच्या पिल्लांची अगोदरच बुकिंग केली जात आहे. बिटल जात चांगली असल्यामुळे लोक पाच-सहा महिने वेटींगवर राहुन २० किलोचे पिल्ल खरेदी करत आहेत.
बीटल शेळी मुळ पंजाब, हरियाणा व राजस्थानच्या काही भागात आढळते. सर्वांत जास्त पंजाबच्या गुरुदासपूर, अमृतसर व फिरोजपूर जिल्ह्यामध्ये ही शेळी पाळली जाते. जरी शेळी पंजाबच्या भागात अढळणारी असली तरी, आज देशाच्या विविध भागात बीटल शेळी पाळली जात आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये या शेळीच्या मांसाला ५०० ते ७०० रुपये प्रती किलो प्रमाणे भाव मिळत आहे. हे भाव शेळीच्या गुणवत्तेवरुन ठरवले जाते. भाव आणि मागणी जास्त असल्यामुळे अनेकजण ही शेळी खरेदीसाठी उत्सुक आहेत.
या शेळी साठी चांगल्या प्रतीचा चारा मिळाला तर अधिक उत्पन मिळते. गिन्नी गवत, मका, कडवळ, मेथी घास, खुरपलेले गवत, कडबा, दशरत ग्रास, हादगा,शेवरी, सुभाबूळ,शेतातील पाला पाचोळा असा चारा दिला जातो. तसेच अधून मधून तुती चा देखील चारा दिला जातो.त्यासाठी तुती ची लागवड देखील करण्यात आली आहे.

बीटलचा बोकड ब्रीडींगसाठी चांगला असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातून ब्रींडीगच्या बोकडाची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागामध्ये आढळणारी गावठी व उस्मानाबादी शेळीला बीटलच्या बोकडाने क्रॉस केल्यास रिझल्ट चांगला मिळत आहे. क्रॉस केल्याने गावठी शेळी व उस्मानाबादी शेळीच्या वजनात वाढ योग्य होत आहे. यामुळे शेळी पालकाला बाजारात भाव चांगला भेटत आहे.

बीटल बकरी ही प्रामुख्याने काळ्या आणि तपकिरी रंगात आढळते. काही शेळ्यांवर पांढ-या रंगाचे डाग असतात.
शेळीची शेपटी मध्यम आकाराची असुन, मागे वळलेली असते.
शेळीचे कान लांब व पानाच्या आकारचे असतात.
नाकाचा आकार रोमण असतो.
शेळीचे शिंगे मागच्या बाजुला वळलेले असतात.
शेळी मांस आणि चांगल्या दुधासाठी ओळखली जाते.
शेळी ही साधारण १ ते २ पिल्ल देते.
नराचे वजन १२ ते १४ महीन्यांत ५५-६५ किलो पर्यंत वाढते. तर मादीचे वजन ४५-५५ पर्यंत वाढते.
शेळी साधारण २ ते ५ लीटर पर्यंत दुध देते. जर दुधासाठी शेळीला योग्य खुराक दिल्यास शेळी 6 ते 7 लीटर पर्यंतही दुध देते.
कोरोना काळात शेळीचे दूध 80रुपये प्रति लिटर प्रमाणे विक्री करण्यात आले.
जन्म झालेल्या पिल्लाचे वजन ३ किलोपर्यंत असते.
ज्यावेळी बाजारात मागणी वाढते. त्यावेळी फसवा-फसवीचे प्रकारही चालु होतात. आणि असेच काही घडत आहे. लोक प्युअर बीटल असल्याचे सांगुन नवशेळीपालकास फसवले जात आहे. गावठी शेळी व उस्मानाबादी शेळीला बीटल बक-यांने क्रॉस केल्यास होणारे पिल्ले थोड्याप्रमाणात बीटल प्रमाणेच दिसतात. या पिल्लांनाच ओरिजनल बीटल सांगून जास्त भावाने विकली जात आहे. त्यामुळे नवशेळीपालकांनी याची काळजी घ्यावी. खात्रीशीर शेळी विक्रेत्याकडूनच बीटल शेळी घ्यावी. दोनपैसे जास्त जातील, पण मिळणारी शेळी ही खात्रीशीर असेल.असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
यात त्यांचे छोटे बंधू प्रफुल्ल शिंदे व अजिंक्य शिंदे यांनी आपले शिक्षण घेत संपूर्ण फार्मची जबाबदारी संभाळली. हि जबाबदारी पेलण्यात शिक्षकीपेशा असलेले वडिल शंकर शिंदे, आई निता, आजोबा माजी सरपंच विठ्ठल शेळमकर ,चुलते रामचंद्र यांनी मोलाची साथ दिली. आज त्यांच्या फार्ममध्ये सुमारे 15 मदर स्टॉकच्या शेळ्या व एक 100 किलो वजनाचा ‘सुंदर’ नावाचा नर. तसेच 11 पिल्ले असून, या शेळ्या एकावेळी दोन ते तीन पिल्लांना जन्म देतात. तर दररोज 2 ते 5 लिटर दूध देतात .याशिवाय पिल्लांचे वजन दररोज 200ते 300 ग्रॅमने वाढते. त्यांना शेळीपालनामध्ये वार्षिक उत्पन्न रु.4ते 5 लाख मिळते.तसेच शेतीसाठी उपयुक्त लेंडीखत ही मिळते. अशा सर्वच बाजूनी फायदेशीर असणारा एक आगळावेगळा गोटफॉर्म शिंदे (शेळमकर) बंधूंनी उभारला असून, त्यांचा हा उपक्रम नक्किच अनूकरणीय आहे.

सदर बोकड विक्री प्रसंगी आनंदनगर च्या सरपंच मेघना इनामके ,माजी सरपंच विठ्ठलराव शेळमकर, ग्रामपंचायत सदस्य गंगाधर चव्हाण , अविनाश माने ,अशोक शेळमकर, साहेबराव दांगट, रामचंद्र शेळमकर,दैनिक सकाळ चे अकलूज प्रतिनिधी शशिकांत कडबाने, दैनिक जनमत चे अकलूज प्रतिनिधी गणेश जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.

.

शुभम शिंदे -शेळीमकर

शेरू विक्री वेळी सन्मान सोहळा 🌹🌹🌹🌹
🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद!                                                भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव;                    रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
Uncategorized

अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!

November 8, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे चित्र स्पष्ट; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली                   महायुतीत बंडखोरीचे संकेत;                                      पदवीधरमध्ये २९ तर शिक्षक मतदारसंघात ३१ उमेदवारांचे अर्ज
Uncategorized

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे चित्र स्पष्ट; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली महायुतीत बंडखोरीचे संकेत; पदवीधरमध्ये २९ तर शिक्षक मतदारसंघात ३१ उमेदवारांचे अर्ज

October 6, 2026
उद्योग महर्षी चषकावर नागपाडा जिमखाना मुंबईचा कब्जाअंतिम सामन्यात नेक्सस नांदेडचा ९४-८६ असा पराभव; ७१ हजार रुपये व चषक पटकावला
Uncategorized

उद्योग महर्षी चषकावर नागपाडा जिमखाना मुंबईचा कब्जाअंतिम सामन्यात नेक्सस नांदेडचा ९४-८६ असा पराभव; ७१ हजार रुपये व चषक पटकावला

October 6, 2026
अंगावर शहारे आणणारा “स्टोरी शिवराज्याभिषेकाची” भव्य ऐतिहासिक नाट्यप्रयोग; अकलूजमध्ये हाऊसफुल प्रतिसाद
Uncategorized

अंगावर शहारे आणणारा “स्टोरी शिवराज्याभिषेकाची” भव्य ऐतिहासिक नाट्यप्रयोग; अकलूजमध्ये हाऊसफुल प्रतिसाद

August 3, 2026
पाठपुराव्याला यश; दत्तनगर-खंडाळी परिसरात घरोघरी वीजबिलांचे वाटप सुरू
Uncategorized

पाठपुराव्याला यश; दत्तनगर-खंडाळी परिसरात घरोघरी वीजबिलांचे वाटप सुरू

July 30, 2026
अवघ्या 3 मिनिटे 39 सेकंदांत 120 अबॅकस प्रश्न सोडवणाऱ्या नंदुरबारच्या प्रनिकाची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा
Uncategorized

अवघ्या 3 मिनिटे 39 सेकंदांत 120 अबॅकस प्रश्न सोडवणाऱ्या नंदुरबारच्या प्रनिकाची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा

July 13, 2026
Next Post
खदान विरोधी संघर्ष सुरुच ठेवणार : विरोधकांचे डाव हाणुन पाडण्यासाठी सहकार्य करा- सैनु गोटा यांचे आवाहन

खदान विरोधी संघर्ष सुरुच ठेवणार : विरोधकांचे डाव हाणुन पाडण्यासाठी सहकार्य करा- सैनु गोटा यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In