आ.राम सातपुतेंच्या गाडीचा अपघात
पांडुरंगाच्या कृपेने सुखरूप, काळजी करण्याचे कारण नाही-आ.राम सातपुते
अकलूज (प्रतिनिधी )भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार राम सातपुते यांच्या गाडीचा वेळापूर येथे अपघात झाला.आ. राम सातपुते यांची गाडी सर्विसिंगला दिलेली असल्याने ते मित्राची गाडी घेवून कार्यक्रमासाठी निघाले होते. गाडीमधील कोणालाही खरचटलेसुद्धा नाही. वेळापूरच्या शंभू महादेवाच्या नगरीत आ.राम सातपुते यांच्यासह विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे, चालक सर्व सहीसलामत आहेत.काही काळजी करण्याचे कारण नाही.आमदार राम सातपुते मुंबई, पुणे येथील कामे आटोपुन आज सकाळी मतदारसंघातील लग्न सोहळा व इतर कार्यक्रमांना भेटी देऊन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या टेंभुर्णी येथील कार्यक्रमासाठी जात असताना पुणे-पंढरपूर रोडवर वेळापूर येथे अचानक ट्रॅक्टर आडवा आल्याने चालकांनी बाजूला घेत असताना डीवाईडरवर गाडी गेली आणि समोरचे दोन्ही टायर फुटल्याने गाडी बाजूच्या शेतामध्ये गेली. सुदैवाने गाडीमधील आमदारासह कोणालाच दुखापत अथवा इजा झालेली नाही.आमदार यांच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर माळशिरस तालुक्यात वार्यासारखी बातमी पसरली. अनेकांचे फोन एकमेकांना खणाणू लागले. आमदार राम सातपुते यांच्याशी संपर्क केला असता जनतेच्या सेवेमुळे अपघात होऊनसुद्धा खरचटले नाही. शंभू महादेवाच्या नगरीमध्ये अपघात झालेला आहे. गाडीचे टायर फक्त फुटलेले आहेत, बाकी काही नाही. माळशिरस तालुक्यातील जनतेने काळजी करण्याचे कारण नाही, आपला आशिर्वाद कायम पाठीशी असल्याने भविष्यात आपली सेवा कायम करणार असल्याचे आमदार राम सातपुते यांनी सांगितले.जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे भाजप आमदार राम सातपुते यांच्या गाडीला अपघात झाला आहे. गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती खुद्द राम सातपुते यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करुन दिली आहे. “मी सुखरूप आहे, मला कसल्याही प्रकारची इजा झालेली नाही. आतापर्यंत केलेलं काम आणि लोकांचे आशीर्वादामुळे मी थोडक्यात बचावलो”, अशी प्रतिक्रिया अपघातानंतर त्यांनी दिली आहे.आमदार राम सातपुते हे भाजपचे युवा डॅशिंग आमदार आहेत. आपल्या पक्षाची रोखठोक आणि आक्रमक पद्धतीने बाजू मांडण्यासाठी त्यांची राज्यभरात ओळख आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. आज विविध कामांसाठी मतदारसंघात ते गाडीने प्रवास करत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. आपण सुखरुप असल्याचं त्यांनी व्हिडिओ व्हायरल करुन सांगितलं आहे.अपघातानंतर राम सातपुते यांनी व्हिडिओ जारी करत म्हटलं आहे, “मतदारसंघातील प्रवासादरम्यान माझा अपघात झाला. यामध्ये गाडीचे तीन टायर फुटले. परंतु जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने, आजपर्यंत माझ्या हातून जे काही पुण्य घडलं तसेच पांडुरंगाच्या कृपेने मी या अपघातातून सुखरूप बचावलो. तालुक्यातील जनतेच्या आशिर्वादाने माझ्या केसालाही धक्का लागला नाही. मला आणि माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची इजा अथवा काहीही दुर्घटना घडलेली नाही”.राम सातपुते यांच्या अपघाताचं वृत्त समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखं पसरलं. तेव्हापासून तालुक्यातील तसेच राज्यसभरातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे त्यांना फोन यायला सुरुवात झाली. परंतु गाडीचे तीन टायर जरी फुटले असले तरी माझ्या केसालाही धक्का लागला नाही, त्यामुळे कुणीही काळजी करु नये, असं आवाहन राम सातपुते यांनी केलं आहे.













