23 मार्च 1994 ला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून आज मराठा समाज ओबीसी आरक्षण पासून वंचित राहिला. मराठा समाजाचा पुन्हा ओबीसी मध्ये समावेश व्हावा यासाठी उद्या नाना पटोले यांच्या घरावर..🗡आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय अध्यक्षांच्या घरासमोर शांततेत गाजर आणि खंजीर आंदोलन करत आहोत. यापूर्वी 23 मार्च रोजी शरद पवार साहेब यांच्या सिल्व्हर ओक वर खंजीर आंदोलन केले. उद्धव ठाकरे जी यांच्या घरासमोर गाजर आंदोलन केले. चद्रकांत दादा पाटील यांच्या घरासमोर सुद्धा गाजर आंदोलन केले. पैकी फक्त चंद्रकांत दादा यांनी मराठा समाजाचे निवेदन स्वीकारले आणि पाऊण तास चर्चा करून समाजाची भावना समजून घेतली. आम्ही उद्या काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या घरासमोर जाऊ. त्यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने येणाऱ्या क्रांतिकारकां कडून निवेदन स्वीकारून, भावना समजून घेण्या इतपत मनाचा मोठेपणा दाखवावा. आणि भविष्यात मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करण्याकरिता सकारात्मक भूमिका घ्यावी हीच समाजाची इच्छा.
सकल मराठा समाज.मराठा क्रांती मोर्चा.मराठा क्रांती ठोक मोर्चा.












