*छत्रपती संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग मोकळा ; शरद पवारांनी नांदेड येथे दिले संकेत ‘*
नांदेड (प्रतिनिधी )छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. त्यांना आता अपक्ष आमदारांचा देखील पाठिंबा मिळू लागला असताना राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना पाठिंबा दर्शविन्याचे संकेत दिले आहेत . शिल्लक राहणारी आमची मते सहाव्या जागेसाठी आम्ही छत्रपती संभाजीराजेंना देऊ. असे शरद पवारांनी नांदेडमध्ये सांगितले आहे. पवार यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत आपली भूमिका विषद करताना छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीस महाविकास आघाडीकडून पाठिंबा जाहीर केलेला आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकते . याव्यतिरिक्त शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंना देऊ.शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून येऊन महाविकास आघाडीकडे २७ मते शिल्लक राहतात. तर पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांची संख्या धरून महाविकास आघाडीकडे एकूण ४६ मते शिल्लक राहतात. संभाजीराजे यांना निवडून येण्यासाठी ४२ मतांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीच्या शिल्लक मतांच्या आधारे संभाजीराजे सहजरित्या राज्यसभेत जाऊ शकतात.त्यामुळे आता छत्रपती संभाजीराजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे संभाजीराजे यांच्या समर्थकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.












