सोमनाथ खंडागळे यांना राज्यस्तरीय ‘छत्रपती संभाजी राजे कार्य गौरव पुरस्कार २०२२’
अकलूज : येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सोमनाथ खंडागळे यांना राज्यस्तरीय ‘ छत्रपती संभाजी राजे कार्य गौरव पुरस्कार २०२२’ ने सन्मानित करण्यात आले.शंभू सेनेच्या वतीने सोमनाथ खंडागळे यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार माढा येथे झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ सूरेश ढेरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मान पत्र, मानाचा फेटा, शाल, श्रीफळ प्रदान करण्यात आलले. सोमनाथ खंडागळे यांनी गेल्या अनेक संकटे, आव्हाने आणि प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप करणे, कोरोनाच्या काळात वृद्धाश्रमात व बालाश्रमात गोरगरिबांना धान्य वाटप, शिक्षक, वकील, डॉक्टर, पत्रकार, कला, क्रीडा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करणे, हुशार परंतू गरीबगरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक व शैक्षणिक मदत करणे आदि समाज उपयोगी कामे त्यांनी केली असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे सोमनाथ पांडुरंग खंडागळे यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत











