*माळशिरस तालुक्यात रिपब्लिकन पक्ष आठवले गट पुनर्बाधणीची गरज*
*बी टी शिवशरण*सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका एकेकाळी रिपब्लिकन पक्षाचा मजबूत बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा तालुक्यात या पक्षाची मजबूत बांधणी होती कार्यकर्ते विश्वासू होते नेते एका विचाराने कार्यरत होते मात्र गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील कार्यकर्त्यांना गळती लागली आहे अनेक जण पक्ष सोडून इतर पक्षाच्या दावणीला बांधून घेऊ लागले आहेत दलित पँथरचे सुरुवाती पासून जे कार्यकर्ते नेते रामदास आठवले राजाभाऊ सरवदे यांचे नेतृत्वाखाली काम करत आहेत ते पक्षाशी एकनिष्ठ प्रामाणिक राहून स्वाभिमान अस्मिता जागृत ठेवून फुले शाहू आंबेडकर विचारधारा प्रमाण मानून आपल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवून चळवळीला कायम बांधील राहिले आहेत मात्र गेल्या काही वर्षांपासून माळशिरस तालुक्यात रिपब्लिकन पक्षाची घसरण होत असल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही पक्ष कार्यकर्ते नेते कुठे कमी पडले युवकांना विश्वास ताकद देण्यास कशाची अडचण आली रिपब्लिकन पक्ष तालुक्यात एकसंध मजबूत तसेच रामदास आठवले राजाभाऊ सरवदे यांचेवर निष्ठा प्रेम आदर असणारा सद्यकालीन स्थितीत का दुरावला याचे तालुक्यातील नेते कार्यकर्ते यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे या संदर्भात धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला असता युवकांनी असे मत व्यक्त केले आहे की माळशिरस तालुक्यात तेच तेच नेते तेच कार्यकर्ते रामदास आठवले राजाभाऊ सरवदे तालुक्यात आले की त्यांच्यापुढे पुढं पुढं करतात इतरांना आठवले सरवदे यांना भेटता येत नाही गेल्या काही वर्षापुर्वी ज्या काही रिपब्लिकन पक्षाच्या शाखा उद्घाटन करण्यात आल्या त्यानंतर नवीन शाखा नवीन कार्यकर्ते का जोडले जात नाहीत तालुक्यात राजाभाऊ सरवदे यांना मानणारा मोठा वर्ग आहे मधल्या काही महिन्यांपूर्वी नगरपंचायत निवडणूका झाल्या सगळे कार्यकर्ते नेते एक होऊन जर प्रामाणिक राहून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार यांना निवडून आणण्यासाठी झटले असतें तर रिपब्लिकन पक्षाचे किमान तालुक्यात पाच नगरसेवक निवडून आले असते मात्र श्रीपूर महाळुंग नगरपंचायत निवडणूक सोडली तर माळशिरस नातेपुते या दोन नगरपंचायतीला पक्षाचे तिकिटावर एकही उमेदवार निवडणूक लढला नाही आश्चर्य म्हणजे श्रीपूर मध्ये पक्षाचे तिकिटावर लढलेला एक उमेदवार अवघ्या तीन मताने एकजण पराभूत झाला तर पक्षाचे तिकिटावर जनरल जागेवर निवडणूक लढलेली एक महिला जनरल जागेवर कमी मताने पराभूत झाली माळशिरस तालुक्यात रिपब्लिकन पक्षाचे सर्वच नेते कार्यकर्ते यांनी आत्मचिंतन करण्याची ही वेळ आहे एरवी पक्षाचे नावांवर रुबाब प्रतिष्ठा घेउन समाजात गावात तालुक्यात सन्मान घेणारे काही नेते कार्यकर्ते निवडणुका आल्या की दलबदलू भुमिका घेऊन स्वार्थाचा बाजार करण्यासाठी जिकडे खोबरं तिकडे चांगभलं असं का वागतात त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येक निवडणुकीत पराभव हा ठरलेला असतो यासाठी चळवळीत राहुन चळवळीशी गद्दार असलेल्या तसेच स्वतःचे स्वार्थापायी पक्षाशी बेइमानी करणारे कार्यकर्त्यांना खड्या सारखे बाजुला काढले तरच पक्ष वाढेल हा विषय फक्त निवडणुकी पुरता मर्यादित नसावा







