..*कर्नाटकात घुसून कन्नडीगांना धडा शिकवू-शिवस्वराज्य युवा संघटनेचा इशारा*
पंढरपूर/प्रतिनिधी…छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून कर्नाटक सरकारने या प्रायोजित उध्वंस तात्काळ थांबवावा अन्यथा शिवरायांचा महाराष्ट्र अन्यायाचा वचपा काढून जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहे असा खणखणीत इशारा देत शिवस्वराज्य युवा संघटनेच्या मावळ्यांनी कर्नाटक सरकाराला दिला.महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाने वेगळे वळण घेतले असून पारंपारिक सीमा वाद जैसे थे असतांना सोलापूर सांगली या महाराष्ट्रातील जिल्ह्यात कर्नाटक सरकार पाय पसरण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या योजत असल्याने हा मुद्दा आणखी संवेदनशील बनला आहे.कर्नाटक सरकारने कन्नडी जनतेला चिथावणी मिळेल अशी भूमिका घेतल्याने कन्नडी समुदाय महाराष्ट्रातील वाहने निवडून दगडफेक करीत असल्याच्या घटना वाढल्या आहेत.बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकसह इतर वाहनांवर दगडफेक करण्यात आली.एकूणच कर्नाटकचा महाराष्ट्रा विरुद्ध सुरु झालेला अघोषित लढा परतवून लावण्यासाठी महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनाही सरसावल्या असून महाराष्ट्रामध्ये शिवस्वराज्य युवा संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळेल.शिवस्वराज्य युवा संघटनेच्या यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी एकत्र येत कर्नाटक सरकारच्या महाराष्ट्र द्वेषी भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करून घोषणा बाजी केली.कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल.अशी भुमीका शिवस्वराज्य युवा संघटनेने घेणार आहे.रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक जातात,त्यांची सुरक्षा सरकारने करावी,महाराष्ट्राची अस्मिता जपणं हे प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांचे कर्तव्य आहे ही राजकारण करण्याची वेळ नाही सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन कर्नाटकी सरकारला धडा शिकवला पाहिजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर जर कोणी घाला घालीत असेल तर यानंतर त्याला जशास तसे उत्तर देऊन प्रत्युत्तर दिल्या जाईल. महाराष्ट्रातील गाड्या फोडून आम्ही फार मोठा पराक्रम केला असा समज असेल तर शिवस्वराज्य स्वराज्य संघटना एक सुद्धा कर्नाटकची गाडी महाराष्ट्रात येऊ देणार नाही.कर्नाटकी माणसांना धंदे व्यवसाय महाराष्ट्रात करू देणार नाही.तुम्हाला मराठी लोकांच्या बद्दल एवढी चीड निर्माण होत असेल तर आम्हालाही तुमच्या चारपट चिड येते हेही विसरू नका. छत्रपतींचे विचार छत्रपतींचे संस्कार आमच्या रक्तात आहेत,म्हणून आतापर्यंत शांत होतो परंतु आता यापुढे कर्नाटकी सरकारची कुठलीही आगळीक सहन करणार नाही.प्रसंगी शिवस्वराज्याचे मावळे कर्नाटकात घुसून बदला घेतील.अशा इशारा शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील यांनी कर्नाटक सरकाराला दिला आहे.








Om
King om