जमिनीच्या पैशाच्या कारणावरून जांबूड येथील मुलाने केला आईचा खून
जांबूड (प्रतिनिधी )जमीन विकून आलेल्या पैशाचे तसेच जांभूड येथील जमिनीचे कारणावरून डोक्यात दगड घालून मारून जांबूड येथील सुरेखा तुकाराम बाबर( वय 65 वर्षे )यांना विहिरीत टाकल्या प्रकरणी तुकाराम मारुती बाबर (वय 70 वर्षे )धंदा शेती -रा, 15 शिक्षण जांबुड तालुका माळशिरस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकलुज पोलीस ठाणे येथे गु. र. नं. 349/2022 भा द वि 302,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीना अटक करण्यात आली आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून तुकाराम मारुती बाबर वय 70 वर्षे धंदा शेती -रा, 15 शिक्षण जांबुड तालुका माळशिरस यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. आरोपी प्रदीप तुकाराम बाबर , मोनाली प्रदीप बाबर दोघे राहणार शिक्षण जांबुड तालुका माळशिरस यांना अटक करण्यात आली आहे.11-05-2022 रोजी 16.00 वा चे सुमारास प्रदीप बाबर आणि मोनाली बाबर यांनीसुरेखा बाबर यांना दगडाने मारून विहिरीत ढकलले.दरम्यान 15/05/2022 रोजी 15/40 वा. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात हकीकत अशी की दिनांक 11/05/22 रोजी सायंकाळी 04.00 वा चे सुमारास भुसनर याचे शेती गट नंबर 491 मधील विहिरीजवळ जांबुड येथे मयत झाल्याने अकलूज पोलीस स्टेशन अ .म .नं 41 /22 सीआरपीसी 174 प्रमाणे दाखल आहे. फिर्यादी ची पत्नी सुरेखा तुकाराम बाबर (वय 65)हिस माझा मुलगा प्रदीप तुकाराम बाबर तसेच सून मोनाली प्रदीप बाबर दोघे राहणार जांबुड तालुका माळशिरस यांनी जमीन विकून आलेल्या पैशाचे तसेच जांभूड येथील जमिनीचे कारणावरून डोक्यात दगड घालून मारून विहिरीत टाकले आहे म्हणून 15-5-2022 रोजी तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास अकलूज पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मपो सई शिंदे या करीत आहेत.







