आ. राम सातपुते हे आमच्यासाठी देवदूतच- अर्जुन ओव्हाळ
अकलूज (प्रतिनिधी )मी सदाशिवनगर ता.माळशिरस येथील रहिवासी असून पुण्याच्या मार्केट यार्डात हमालीचे काम करतो माझी पत्नी हृदयाच्या आजाराने त्रस्त होती तिच्यावर ऑपरेशनची गरज होती परंतु पुण्यामध्ये ऑपरेशन करणं माझ्या सारख्या हामालाला शक्य नव्हतं मी आ राम सातपुते यांना भेटण्यासाठी थेट माळशिरस गाठलं अन कोणाच्याही वशिल्या शिवाय आ राम सातपुते यांनी माझ्या पत्नीचं साडेसहा लाख रुपयांचं ऑपरेशन मोफत केलं यामुळे आमदार राम सातपुते हे आमच्यासाठी देवदूतच आहेत असे अर्जुन ओव्हाळ यांनी सांगितले . पुणे येथे हमालीचे काम करणारे अर्जुन ओहाळ हे गेल्या सात ते आठ वर्षांपसून पुणे येथे राहत असून सणासुदीलाच गावाकडे येत असतात वास्तविक पाहता पोटाची खळगी भरण्यासाठी मतदानालाही गावाकडे न येणारे ओव्हाळ यांनी सोशल मीडियावर माळशिरस चे आ राम सातपुते हे गरजू व गरीब कुटुंबांना पुणे, मुंबईसारख्या शहरांमधील मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करून देतात ही माहिती मिळताच ओव्हाळ हे माळशिरस ला आले व आ राम सातपुते यांची भेट घेतली यावेळी आ राम सातपुते यांनी अर्जुन ओव्हाळ यांची पत्नी हृदयाच्या आजाराने त्रस्त असल्याची माहिती ऐकून पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात साडेसहा लाख रुपयांचं मोफत ऑपरेशन करून दिल्याने ओव्हाळ कुटुंबीयांवर वेळ आली होती पण काळ आला नव्हता अशी म्हणण्याची वेळ आली आहे माळशिरस तालुक्यातील अनेक गरजू व गरीब कुटुंबांना आ राम सातपुते यांनी या अगोदरही लाखो रुपयांचे मोफत उपचार पुणे मुंबईसारख्या शहरांमधील मोठ्या हॉस्पिटलमध्ये करून दिले आहेत एवढेच नाही तर त्या ठिकाणी ते पेशंट ऍडमिट असताना हॉस्पिटलमध्ये स्वतः जाऊन भेट देऊन त्यांची विचारपूस करीत आहेत यामुळे गरजू व गरीब रुग्णांसाठी आ राम सातपुते हे देवदूतच ठरत असल्याची चर्चा संपूर्ण तालुकाभर होताना दिसून येत आहे .











