कै. प्रसाद जोगळेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त विनम्र अभिवादन
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक प्रसाद वसंतराव जोगळेकर यांचे हृदयविकाराच्या आजाराने 25-05-2021रोजी वयाच्या 60व्या वर्षी निधन झाले . 15-05-2022रोजी त्यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.साप्ताहिक गावकुसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या पत्रकारीतेला सुरुवात केली होती . राज्यातील विविध दैनिकाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले . सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्याची वरदायिनी असलेल्या उजनी पाणी प्रश्नावर त्यांनी गेल्या वर्षी मंगळावर 25-5-2021रोजी सायंकाळी ५ वाजता एक व्हिडिओ वार्तापत्र बनविले . त्यानंतर मित्रांशी गप्पा मारत असतानाच सायंकाळी ५ . २५ वाजता त्यांना अचानक चक्कर आली व ते कोसळले . त्यानंतर त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.साप्ताहिक गावकूस सुरु केल्यानंतर काही वर्षांनी ते बंद करून त्यांनी दैनिक सुराज्य मध्ये काही वर्षे उप संपादक म्हणून काम केले. सुराज्य चे काम बंद केल्यानंतर त्यांनी अक्षरगीत नावाचे मासिक सुरु केले.त्यानंतर त्यांनी दैनिक जनमत चे उप संपादक, व अकलूज चे प्रतिनिधी म्हणून काही काळ काम केले होते.एक निर्भीड आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारे एक झुंजार पत्रकार होते . जे सत्य आहे ते कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे मांडत होते . लोकांच्या अडचणी ला धावून जाऊन त्यांना मदत करीत होते. तसेच रोखठोक पत्रकारिता हा त्यांच्या पत्रकारीतेचा गुणधर्म होता . सर्वसामान्याच्या समस्या सोडविन्या साठी ते सतत आग्रही होते . त्यांनी आपल्या कारकीर्द मध्ये अनेक प्रश्न मांडून ते सोडविन्यासाठी प्रयत्न केला.. तसेच ते आपल्या मित्रमंडळी च्या सुख दुःखात हिरीरीने सहभाग घेत होते.जोगळेकर हे उजनी पाणी प्रश्नावर विश्लेषणात्मक व्हिडिओ तयार करत असताना मरण पावले .त्यांनी शेवट च्या श्वासापर्यंत पत्रकारिता केली. काखेत शबनम,अंगात कुर्ता,पायात पायजमा घातलेला,कधी उपाशी तापाशी,उन्हा तान्हात कोर्टात,कचेरीत, पंचायत समितीत तहसील कार्यालयात कुठे ही जोगळेकर हमखास दिसायचे.काका नेहमी सकारात्मक पत्रकारिता करीत होते. एव्हडेच नव्हे तर पत्रकारिता करीत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक गोरगरीब लोकांना मदत करीत होते.रस्त्यात ओळखीचे कोण भेटले की त्याला आपल्या ऑफिस मध्ये बोलावून चहा पाजून त्याची विचारपूस करायचे. त्यांनी आपल्या मनमिळावू स्वभावामुळे अनेक मित्रमंडळी जोडली होती.काका आज आपल्यात नाहीत या गोष्टीवर खरे तर आजही विश्वास बसत नाही. परंतु दुर्दैवाने आज ते आपल्यात ते नाहीत.आज प्रसाद जोगळेकर यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.











