• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home Uncategorized

पुरूष वंध्यत्व अन् आयुर्वेद-.डॉ.हर्षवर्धन वसंतराव गायकवाड(एम.डी.आयु.)मो.नं.9970611617

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
May 13, 2022
in Uncategorized
0
पुरूष वंध्यत्व अन् आयुर्वेद-.डॉ.हर्षवर्धन वसंतराव गायकवाड(एम.डी.आयु.)मो.नं.9970611617
0
SHARES
360
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुरूष वंध्यत्व अन् आयुर्वेद-.डॉ.हर्षवर्धन वसंतराव गायकवाड(एम.डी.आयु.)मो.नं.9970611617

स्वता: सारखाच दुसरा सजीव निर्माण करणे हे सजीवाची जी वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. त्यातले एक महत्वाचे वैशिष्ट्ये आहे, यालाच आपण प्रजोत्पादन असे म्हणतो. प्रजोत्पादनाची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याला जननक्षम असे म्हणतात. ज्याच्यामध्ये प्रजोत्पादनाची क्षमता अजिबात नाही त्याला वंध्यत्व असे म्हणतात. सध्याची परिस्थिती लक्षात घेता पुरूष वंध्यत्वाचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येते. याचे कारण म्हणजे कामाचा ताणतणाव, धावपळ, अनियमित झोप, व्यायामाचा अभाव, पौष्टिक पदार्थांचा खाण्यामध्ये अभाव, वाढती व्यसनाधीनता, तरुणपणातील चुकीच्या सवयी, या सर्वांचा शुक्र चातुनिर्मिती व वर्धनावर दुष्परिणाम होत असतो व परिणामस्वरूप पुरूषाला वंध्यत्वाला सामोरे जावे लागते. फक्त स्त्रीलाच वांझपणा असतो असे नाही तर हा दोष पुरूषामध्ये सुद्धा असू शकतो. हा दोष वीर्याची तपासणी करून समजतो. 10 टक्के पुरूष हे प्रजननास पूर्णत: असमर्थ असतात. लग्न झालेल्या 100 पुरूषांमध्ये एक व्यक्ती पूर्णत: प्रजननास असमर्थ असलेली आढळून येते.कारणे :-1) पुरूष वंध्यत्वाचे प्रमुख कारण म्हणजे पुबीज किंवा शुक्रधातुची निर्मिती न होणे किंवा कमी प्रमाणात होणे.* शुक्रजंतू अजिबात तयार होत नाहीत. त्या अवस्थेस एझोस्पर्मिया (Azoospermia) असे म्हणतात. * जर ते कमी प्रमाणात तयार होत असतील तर त्या अवस्थेला ऑलिगोस्पर्मिया (Oligospermia) असे म्हणतात. याची कारणे खालीलप्रमाणे –- अंडकोष वृषणात फार उशिरा उतरणे किंवा अजिबात न उतरणे.- अंडाशयाची वाढ स्वाभाविक प्रमाणात न होणे.- अपघात शस्त्रक्रिया किंवा क्ष-किरणांच्या उत्सर्जनामुळे अंडकोषाला इजा पोहचणे.- घट्ट वस्त्रांचा वापर केल्यास तेथील उष्णता वाढल्याने तसेच अतिकडक पाण्याचा शेक घेतल्याने देखील तापमानाचा अंडकोषावर परिणाम होतो.- इतर शारीरिक व मानसिक तक्रारी.- वय, वयाच्या 40 वर्षानंतर पुरूषांची जननक्षमता कमी होत जाते.2) दोन्ही वीर्यवाहक नलिका, शुक्रनलिका यामध्ये अडथळा असल्यामुळे 3) जन्मजात वैगुण्य – जन्मजात वीर्यवाहक नलिका नसल्यामुळे तसेच जन्मत:च वीर्यवाहक नलिकेमध्ये अडथळा असल्यास4) प्रजोत्पदनास असमर्थ असल्यामुळे (Impotance) वेळेपूर्वीच वीर्यपतन होणे.5) फायमोसिस सारखे शिश्नातील दोष असल्यास6) संभोगाच्यावेळी एकदम कमी वीर्य बाहेर पडत असल्यास7) वीर्याचे घटक रासायनिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्यासल अस्वाभाविक असल्यास.8) शीघ्रपतन, स्वप्नदोष, लघवीतून धातू जाणे, वीर्य पातळ होणे असे दोष आढळल्यास पुरूष वंध्यत्व होण्याचा धोका असतो.आयुर्वेदिक चिकित्सा :-1) पुरूष वंध्यत्वासाठी चिकित्सा करताना नेमके निदान करून त्यानुरूप चिकित्साक्रम हा निश्चित करावा लागतो.2) सर्वप्रथम आयुर्वेदामध्ये जी प्राकृत शुक्राची लक्षणे वर्णन केलेली आहेत, त्याकरिता शुक्रातील दोष घालवून प्राकृत शुक्र निर्मिती करण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.3) गर्भधारणेची पहिली पायरी म्हणजे शरीरशुध्दी त्यामुळे पंचकर्म उपचार हे खूप फलदायी ठरतात.4) बिघडलेली दिनचर्या, ऋतुचर्या, आहार, विहार, निद्रा व्यवस्थिती केली पाहिजे.5) यामध्ये शिरोधारा, वमन, विरेचन, बस्ति, उत्तरबस्ति यासारखे उपचार घेतल्याने शरीरशुद्धी तर होतेच त्याचबरोबर बीजशुद्धी होऊन नितळ कांतीचा लाभ होतो, सर्व इंद्रियांची शक्ती वाढते, मन प्रसन्न राहते, तसेच स्त्री-पुरूषांमधील आकर्षणही वाढते.6) शुक्रधातू संवर्धनासाठी आहारामध्ये दूध, लोणी, खडीसाखर, तूप, काळे मनुके, खारीक, अंजीर, बदाम अशा सात्विक द्रव्यांचा समावेश करावा.7) दुधाचा जास्तीत जास्त वापर करावा कारण दूध हे वल्य, वृष्य असून श्रेष्ठतम रसायन व वाजीकरण द्रव्य आहे.8) रोज आदल्या दिवशी पाण्यात भिजवलेले 4-5 बदाम सोलून सकाळी खावेत, त्याचबरोबर पंचामृत (साखर, मध, दही, तूप, दूध एकत्र करुन) चिमुटभर केशराची पूड एकत्र करून सकाळी नाश्ता करण्यापूर्वी घ्यावे.9) तसेच वानरीकल्प, पुष्पधन्वा वटी, वृष्यवटी, कवचबीज, मुसळी चूर्ण, शतावरी कल्प अशा प्रकारचे आयुर्वेदात सांगितलेले योग व कल्पांचा योग्य स्थिती पाहून वापर केल्याने वंध्यत्वासारख्या गंभीर दोषावर विजय प्राप्त करता येतो.10) संबंधित रूग्णांनी तज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊनच औषधोपचार सुरू करावा.- डॉ.हर्षवर्धन वसंतराव गायकवाड(एम.डी.आयु.)मो.नं.9970611617 / 8459026029द्वारका आयुर्वेदिक हॉस्पिटल व केरळीय पंचकर्म केंद्रशाखा – पुणे, कोथरूड व अकलूज

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद!                                                भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव;                    रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
Uncategorized

November 8, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे चित्र स्पष्ट; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली                   महायुतीत बंडखोरीचे संकेत;                                      पदवीधरमध्ये २९ तर शिक्षक मतदारसंघात ३१ उमेदवारांचे अर्ज
Uncategorized

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे चित्र स्पष्ट; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली महायुतीत बंडखोरीचे संकेत; पदवीधरमध्ये २९ तर शिक्षक मतदारसंघात ३१ उमेदवारांचे अर्ज

October 6, 2026
उद्योग महर्षी चषकावर नागपाडा जिमखाना मुंबईचा कब्जाअंतिम सामन्यात नेक्सस नांदेडचा ९४-८६ असा पराभव; ७१ हजार रुपये व चषक पटकावला
Uncategorized

उद्योग महर्षी चषकावर नागपाडा जिमखाना मुंबईचा कब्जाअंतिम सामन्यात नेक्सस नांदेडचा ९४-८६ असा पराभव; ७१ हजार रुपये व चषक पटकावला

October 6, 2026
अंगावर शहारे आणणारा “स्टोरी शिवराज्याभिषेकाची” भव्य ऐतिहासिक नाट्यप्रयोग; अकलूजमध्ये हाऊसफुल प्रतिसाद
Uncategorized

अंगावर शहारे आणणारा “स्टोरी शिवराज्याभिषेकाची” भव्य ऐतिहासिक नाट्यप्रयोग; अकलूजमध्ये हाऊसफुल प्रतिसाद

August 3, 2026
पाठपुराव्याला यश; दत्तनगर-खंडाळी परिसरात घरोघरी वीजबिलांचे वाटप सुरू
Uncategorized

पाठपुराव्याला यश; दत्तनगर-खंडाळी परिसरात घरोघरी वीजबिलांचे वाटप सुरू

July 30, 2026
अवघ्या 3 मिनिटे 39 सेकंदांत 120 अबॅकस प्रश्न सोडवणाऱ्या नंदुरबारच्या प्रनिकाची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा
Uncategorized

अवघ्या 3 मिनिटे 39 सेकंदांत 120 अबॅकस प्रश्न सोडवणाऱ्या नंदुरबारच्या प्रनिकाची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा

July 13, 2026
Next Post
रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे त्यामुळे अनेकांचे प्राण वाचतात.डॉ.बसवराज शिवपुजे*

रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे त्यामुळे अनेकांचे प्राण वाचतात.डॉ.बसवराज शिवपुजे*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In