*रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे त्यामुळे अनेकांचे प्राण वाचतात.बसवराज शिवपुजे*
संग्रामनगर दि.13 (केदार लोहकरे याजकडून)अकलूज येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक सद्गुरू श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज नगरपरिषद,अकलूज पोलिस स्टेशन व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार अकलूज यांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान
शिबीराचे उदघाटन अकलूज विभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या शुभ हस्ते त्या प्रसंगी ते बोलत होते.
या रक्तदान शिबीरात ४५ साधकांनी रक्तदान केले.यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रामचंद्र मोहिते,पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर,निवृत्त पोलिस निरीक्षक विश्वास साळोखे,आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रम माळशिरसचे संचालक सत्यवान पराडे(सुर्यवंशी), श्री श्री कुस्ती केंद्राचे महादेव ठवरे,व्यसनमुक्त युवक संघाचे समाधान पराडे,शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँकेचे डॉ.बाहुबली दोशी,डॉ.संतोष खडतरे,आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक बाळासाहेब बिचकुले,कृषी अधिकारी उदय साळुंखे,डॉ वसुंधरा देवडीकर,छाया बु-हाडे आदी उपस्थित होते. यावेळी सत्यपाल ताम्हाणे यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.धनंजय देशमुख यांनी केले तर आभार माऊली मुंडफणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगशिक्षक हरीभाऊ माने,राजीव बनकर,विक्रम भोसले,विजय मिसाळ,गोरख डांगे पोलिस कर्मचारी शिवकुमार मदभावे,विद्या गिरमे,जयश्री जगताप,सुजाता अनपट,रेखा नेवसे यांनी सहकार्य केले.














