*संगम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध*चेअरमनपदी विठ्ठलराव ताटे-देशमुख तर व्हाईस चेअरमनपदी शहाजी महाडीक यांची बिनविरोध निवड*
संग्रामनगर दि.12 (केदार लोहकरे याजकडून)संगम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाच्या पंचवार्षिक निवडणूक सन २०२२-२०२७ कालावधी करीता संगम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सभासदामध्ये विकासाच्या मुद्द्यावर एकमत होऊन सदर निवडणूक बिनविरोध करण्याचे एक मताने ठरल्याने मोहिते पाटील समर्थक विठ्ठलराव माणिकराव ताटे-देशमुख यांची चेअरमन पदी तर व्हॉइस चेअरमन पदी शहाजी गौतम महाडीक यांची निवड झाली. संगम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या संगम निवडणुकीत संचालक म्हणून गोवर्धन विठ्ठल ताटे-देशमुख,बाळासाहेब सदाशिव महाडीक,बाळासाहेब माणिक जाधव,बाबू सिताराम शिंदे,शिवाजी महादेव इंगळे,शहाजी गौतम महाडीक,भारत हरिदास पराडे,भारत शामराव झेंडे,सौ.विजयमाला नानासो माने-देशमुख,सौ.रत्नप्रभा सयाजी महाडीक,बाळासाहेब गोपीनाथ गवळी यांचे संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.पी.राऊत यांनी काम पाहिले. सर्व सभासदांच्या एक जुटीने सदर निवडणूक बिनविरोध झाली. त्याबद्दल नूतन चेअरमन विठ्ठलराव ताटे-देशमुख यांनी सर्व सभासद व संगम ग्रामस्थ यांचे आभार मानले व सभासदांच्या हिताचे सर्वोतोपरी काम करण्याचे अभिवचन दिले. सदर निवड प्रसंगी संगम गावातील जेष्ठ, प्रतिष्ठीत नेते मंडळी व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












