• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

माळशिरसकरांनो सावधान!देवगड हापूसच्या नावावर कर्नाटकमधील ’हापूस ची होतेय विक्री

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
May 12, 2022
in आपला जिल्हा
0
माळशिरसकरांनो सावधान!देवगड हापूसच्या नावावर कर्नाटकमधील ’हापूस ची होतेय विक्री
0
SHARES
72
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माळशिरसकरांनो सावधान!देवगड हापूसच्या नावावर कर्नाटकमधील ’हापूस ची होतेय विक्री

अकलूज (प्रतिनिधी )कोकणातील देवगड हापूसची चव चाखण्यासाठी आसूसलेल्या माळशिरस तालुक्यातील अनेक शहरातील, ग्रामीण भागातील ग्राहकांच्या माथी देवगड हापूस सारखाच दिसणारा परंतु चवीला वेगळा असणारा कर्नाटकातील दुय्यम दर्जाचा आंबा मारला जात आहे. साधारणपणे गुणवत्तेनुसार 500 रुपये डझनने देवगड व रत्नागिरीतील हापूस बाजारात मिळत आहे. त्याचा फायदा घेऊन स्वस्त दराचे प्रलोभन दाखवून हापूसच्या नावावर कर्नाटकमधील साधा आंबा खपवून भर रस्त्यावर ग्राहकांची लूट सुरू असल्याचा प्रकार सुरू आहे. देवगड नाव असलेल्या पेट्यांतून हे आंबे विकले जात आहेत.या वर्षी बाजारात कर्नाटकातील व आंध्र प्रदेश मधील आंब्यांची मोठी आवक झाली आहे. अतिशय कमी दराने कर्नाटकातील आंबा उत्पादकांकडून उचलला जातो. हा आंबा येथे विक्रीसाठी आणला जातो. हापूस प्रमाणेच लाकडी पेट्यांत व बॉक्स मध्ये भरून रस्त्यांच्या कडेला, व नाक्‍या-नाक्‍यांवर विक्रेत्यांनी या आंब्यांची दुकाने थाटली आहेत. सुरुवातीला डझनाला ६०० रुपयांचा भाव सांगितला जातो. त्यानंतर घासाघीस करून १०० रुपये कमी करून तो ग्राहकांच्या गळ्यात मारला जातो. त्यामुळे हापूस खरेदी करताना सावधगिरी बाळगा; अन्यथा फसवणूक होण्याची शक्‍यताच जास्त आहे. नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या हापूसच्या देठाजवळ सुरकुती असते. –  हापूस पिकल्यावर केशरी रंगाचा दिसत नाही. –  हापूस नैसर्गिकरीत्या पिकवण्यासाठी नऊ दिवस लागतात. –  कर्नाटकातील आंबा कृत्रिमरीत्या चार दिवसांत पिकवला जातो. – या आंब्यावर सुरकुती पडत नाही. तसेच तो चमकदारही दिसतो.रिकामी आंबा पेटी (लाकडी किंवा पुठ्ठ्याची) यंदा चौपट भावाने विकली जात आहे. कर्नाटक आंबा विकणारे लोक इतर व्यापाऱ्यांच्या रिकाम्या पेट्या, ज्यावर देवगड, रत्नागिरी असे लिहिलेले असते, त्या दुप्पट भावाने विकत घेतात. त्या पेट्यांमध्ये ते कर्नाटकातील आंबा भरून विकत आहेत. कर्नाटक आणि इतर राज्यांतून येणारा आंबा हापूस म्हणून राजरोसपणे विक्री केला जात आहे. त्यामुळे मूळ हापूस उत्पादकांचे नुकसान होत असून, ग्राहकांची फसवणूक होत आहे. फळांचा राजा असलेला आंबा बाजारात दाखल झाला असून तो नाव बदलून विकला जात आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यांतील हापूस आंबा उत्पादकांनी भौगोलिक निर्देशांक (जीआय मानांकन) मिळवला आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांतील हापूस आंबा उत्पादकांनाच हापूस हा शब्द वापरून आंबा विक्री करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. परंतु प्रत्यक्षात बाजारातील चित्र पाहिले, तर कोणताही आंबा हापूस म्हणून विक्री केला जात आहे. हापूस आंबा उत्पादन होण्यापूर्वी देवगड हापूस अशी अक्षरे असलेले पुठ्ठ्याचे लाखो बॉक्‍स छापले आहेत. कर्नाटक आणि इतर राज्यांतील कमी प्रतीचा आंबा या बॉक्‍समध्ये टाकून राजरोसपणे हापूसच्या दराने विक्री केली जाते. गेल्या काही वर्षांपासून हे चित्र दिसून येते. परंतु संबंधितांवर कोणतीही कारवाई होत नाही. बॉक्‍स देवगडी आंब्याचा. त्यावर “देवगड हापूस” असे मराठी भाषेत मोठ्या अक्षरात नाव देखिल कोरले आहे. मात्र आतमधील आंबा हा देवगड मधूनच आलेला असेल याची खात्री मात्र नाही.हापूस आंब्याची चवच न्यारी, त्यामुळेच आंब्याच्या सिझनमध्ये हापूसला आंबाप्रेमी प्राधान्य देतात. रत्नागीरी, देवगडी हापूस आंबा जगप्रसिद्ध असल्याने सध्या लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्याने आंबा खरेदी वाढली आहे. पण, देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री होत असल्याने आंबाप्रेमींची फसवणूक सुरू झाली आहे. नेमका आंबा कसा ओळखावा, याची माहिती नसल्याने अनेकजण बळी पडत आहेत. “देवगड हापूस” असे मराठी भाषेत मोठ्या अक्षरात नाव असले तरी आतमधील आंबा हा देवगड मधूनच आलेला असेल याची खात्री मात्र नाही. अगदी पायरी आंबा देखिल देवगडी हापूस आंब्याच्या बॉक्‍समध्ये ठेवून विक्री केले जात असून ज्यांना आंब्याची जाणीव आहेत, अशांकडून आंब्याची विचारणा केली जाते. केवळ बॉक्‍स पाहून अनेक ग्राहक फसत आहेत.हापूस आंब्याचा आकार इतर आंब्यापेक्षा वेगळा असून देठाकडे हा आंबा वरच्या दिशेने थोडा फुगीर असतो. आंबा त्याच्या सुगंधाने देखिल ओळखला जातो. त्यातच आंबा कापल्यानंतर आंब्याची साल अगदी पातळ असतो तर आंब्याचा गर केशरी रंगाचा असतो. त्यामुळे हापूस आंबा लवकरच ओळखला जाऊ शकतो. ग्राहकांनी ही साधी बाब जरी लक्षात ठेवली तरी केवळ बॉक्‍स पाहून ग्राहक फसणार नाहीत. हापूस आंब्याचा मनसोक्त आनंद घेतला जात आहे त्यामुळे फळबाजारात हापूसची मागणी वाढत आहे. त्याच लाभ उठवत तालुक्यातील काही फळ विक्रेत्यांनी देवगड हापूसच्या बॉक्समध्ये दुसरेच आंबे घालत कमाई सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक व प्रामाणिक विक्रेत्यांच्या व्यवसायाला फटका बसत आहे. कोकणच्या हापूसला जीआय मानांकन मिळाले आहे. त्यामुळे मागणी वाढत असते. अशात जादा नफा कमावण्यासाठी काही व्यापारी देवगड हापूस अशी ठळक अक्षरे छापलेल्या बॉक्समध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश मधून येणारा आंबा मिक्स करत असल्याचे चित्र आहे.कोकणी हापूस मध्यम आकाराचा व जास्त गोडवा असलेला आहे. तर हा हापूस हा कोकणी हापूसच्या तुलनेत दिसायला मोठा व आर्कषक आहे. गोडवा तुलनेने कमी आहे. त्याचे भावही एका पेटीला 500 रुपयांच्या दरम्यान आहेत. असा कमी किमतीचा आंबा देवगड हापूसच्या बॉक्समध्ये घालून तोच देवगड हापूस या नावाने विकला जातो. देवगड हापूस म्हणजे सर्वाधिक भाव म्हणत पैसे जास्त घेतले जातात. काही वेळा पैसे कमी करूनही बॉक्स विकला जातो. यात ग्राहकांची फसगत होते.या उलट देवगडमधून आलेला किंवा अस्सल कोकणी हापूस आंबा अनेक प्रामाणिक विक्रेत्यांकडे आहे. त्याचे भावही बॉक्सला ५०० रुपयांच्या पुढे आहेत. येथे भाव कमी केले जात नाहीत म्हणून अनेक ग्राहक माघारी फिरतात. ज्या बॉक्समध्ये मिक्स केलेला आंबा आहे तो खरेदी करून फसगत करून घेतात. यात प्रामाणिक व्यापाऱ्यांचा व्यवसाय बुडत आहे. फळ बाजारातील आंब्यांचा दर्जा, गुणवत्ता, तपासणी करून ग्राहकांनी आंबा घ्यायला हवा. असे एका व्यापाऱ्याने आवर्जून सांगितले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
ठरावाविनाच  झाले रेती घाटाचे लिलाव ?  अधिकारासाठी पुलखल ग्रामसभेचा एल्गाररेती जप्ती आणि खनिकर्म अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा ग्रामसभेने ठराव केला  मंजूर.

ठरावाविनाच झाले रेती घाटाचे लिलाव ? अधिकारासाठी पुलखल ग्रामसभेचा एल्गाररेती जप्ती आणि खनिकर्म अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा ग्रामसभेने ठराव केला मंजूर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In