इस्लामपूर येथील विजयसिंह मोहिते-पाटील विकास सेवा सोसायटीची निवडणुक बिनविरोध
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथील विजयसिंह मोहिते पाटील विकास सेवा सोसायटीची पंच वार्षिक निवडणुक बिनविरोध झाली असून चेअरमनपदी राजेद्र पाटील तर व्हा.चेअरमनपदी दादासो बुधावले यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सहकार महर्षि कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, बाजार समितीचे चेअरमन मदनसिंह मोहिते-पाटील,आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील,अर्जूनसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची घोडदौड सुरू आहे. भारतीय जनता पार्टीच्या माळशिरस तालुका (महिला) उपाध्यक्षा जयमाला देशमुख यांनी २०१३साली विजयसिंह मोहिते-पाटील विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची स्थापना केली. २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवड सौ.जयमाला देशमुख यांचे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य व त्यास मा.चेअरमन रत्नशिव पवार यांची खंबीर साथ तसेच सभासदांचा सार्थ विश्वासामुळे बिनविरोध झाली. कर्जदार गट-सौ.जयमाला देशमुख, रत्नशिव पवार, राजेंद्र पाटील, उमेश देशमुख, संजय पवार, महादेव देशमुख, बबन देशमुख, चेतन देशमुख, महिला गट,श्रीमती निलाबाई पवार, बकुळाबाई परबतराव, अनुसुचित जाती जमाती गट मधुकर नलवडे, भटक्या विमुक्त जाती जमाती दादासो बुधावले, इतर मागास वर्ग- विठ्ठल कुंभार, असे तेरा सदस्य बिनविरोध निवडून आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी एम.एल.शिंदे(सहाय्यक निबंधक) यांचे अध्यक्षतेखाली चेअरमनपदी राजेंद्र पाटील, व्हा.चेअरमनपदी-दादासो बुधावले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीचे मा.चेअरमन रत्नशिव पवार यांनी सुचविले.


विजयसिंह मोहिते-पाटील विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था,इस्लामपूर पदाधिका-यांचा सत्कार सहकार महर्षि कारखान्याचे चेअरमन मा.श्री.जयसिंह मोहिते पाटील व बाजार समितीचे चेअरमन मा.श्री.मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी धनंजय देशमुख उपस्थित होते. संस्थेने सुमारे १ कोटी वाटप केले असून संस्थेस ऑडीट वर्ग अ आहे .तर संस्थेची कर्ज वसूली १००टक्के असून कारभार पारदर्शी आहे. संस्थेचे सचिव विजयकुमार देशमुख यांनी निवडणुक कामी सहकार्य केले.










