• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

परिचारिकांना आदर आणि सन्मान मिळणे गरजेचे – डॉ. राहुल जवंजाळ     

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
May 12, 2022
in आपला जिल्हा
0
परिचारिकांना आदर आणि सन्मान मिळणे गरजेचे – डॉ. राहुल जवंजाळ     
0
SHARES
65
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परिचारिकांना आदर आणि सन्मान मिळणे गरजेचे – डॉ. राहुल जवंजाळ       

 १२ मे, संपूर्ण जगभरात आजचा दिवस हा ‘जागतिक परिचारिका दिवस’/’आंतरराष्ट्रीय नर्सेस दिन’ म्हणून साजरा केला जातो. जगभरातील वैद्यकीय क्षेत्रात या दिवसाचं एक विशेष महत्त्व आहे.  १२ मे १८२० रोजी परिचारिका क्षेत्राच्या जनक ‘मिस फ्लॉरेन्स नाईटिंगल’ यांचा जन्म झाला म्हणूनच त्यांनी उदयास आणलेल्या परिचारिका क्षेत्र व त्या क्षेत्राच्या विशेष महत्वामुळे त्यांच्या स्मरणार्थ १२ मे  हा ‘जागतिक परिचारिका दिवस’ म्हणून साजरा केला जातो.        दुसऱ्या महायुद्धाच्या काळात  मिस फ्लॉरेन्स नाईटिंगल यांनी हातात लॅम्प घेऊन युद्धाभूमीवर जखमी झालेल्या सैनिकांचा शोध घेत त्या सैनिकांची सुश्रुषा केली आणि  त्यांच्या या कार्यातून जगासमोर ‘परिचारिका क्षेत्र’ उदयास आले.  हातात लॅम्प घेऊन  सैनिकांना शोधून त्यांच्यावर सुश्रुषा करून त्यांचे प्राण वाचविल्या बद्दल मिस फ्लॉरेन्स नाइटिंगल यांना ‘लेडी विथ लॅम्प’ असे ही संबोधिले जाऊ लागले. परिचारिका क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सन १८६० मध्ये लंडन येथे ‘नाइटिंगल नर्सिंग स्कुल’ या नावाने जगातील  पहिले परिचारिका महाविद्यालय सुरु केले. गत वर्षी २०२० मध्ये त्यांच्या जन्म दिवसास २०० वर्ष पूर्ण झाल्याने व कोरोना कालावधीतील परिचारिका यांच्या योगदानामुळे ‘जागतिक आरोग्य संघटना’ यांच्या मार्फत हे २०२० वर्ष ‘परिचारिका वर्ष’ म्हणून घोषित केले होते.         मेंदू आणि हृदय हे दोन भाग महत्वाचे असतात त्यांचं प्रमाणे रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिका हेही दोघे तितक्याच महत्वाचे असतात. सोप्या भाषेत समजून घ्यायच तर रुग्णालय म्हणजे शरीर, डॉक्टर म्हणजे रुग्णालयातील मेंदू आणि परिचारिका म्हणजे रुग्णालयातील हृदय.  कोरोनाने २०२० पासून थैमान मांडले आहेत. यात वैद्यकीय क्षेत्र आणि प्रामुख्याने परिचारिका क्षेत्रातील व्यक्तींनी आपले मोलाचे योगदान दिले आहे व देत आहेत .   या महामारीचा विरोधातील खरी लढाई ही वैद्यकीय क्षेत्र आणि प्रामुख्याने परिचारिका क्षेत्र लढत आहे.  आपल्या जीवाची पर्वा न करता वैद्यकीय क्षेत्र व परिचारिका सामान्य नागरिकांचे जीव वाचविण्यात झटत आहेत.       रुग्ण जरी रुग्णालयात असला तरी त्याला रुग्णालयात घरचं वातावरण तयार करून लवकरात लवकर निरोगी बनविण्याचे काम आणि जबाबदारी परिचारिका क्षेत्रातील व्यक्ती अगदी सहजपणे करीत असतात. या क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या कामाचा मोबदला हा त्यांच्या कामाच्या आणि अत्यावश्यक सेवेच्या मानातून कमी भेटत असेल पण मोबदला किती आणि कसा भेटतो याचा विचार न करता यापेक्षा सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवेचे काम अजून कसे करता येईल यासाठी त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो समाजातील काही समाज करंटे लोकांचा या क्षेत्रातील व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन वाईट आहे. तरी पण त्याच जोमाने, खंबीरपणे, ताकतीने आणि कर्तव्याच्या भूमिकेतुन या क्षेत्रातील व्यक्ती एकनिष्ठेतुन आपली सेवा बजावत आहेत. ज्याप्रमाणे देशाच्या सीमेवर शत्रूंविरोधात आपल्या देशाचे सैनिक लढत असतात त्यामुळे आपल्याला त्यांच्या अभिमान वाटतो त्याचप्रमाणे या कोव्हिड-१९ महामारीच्या काळात कोव्हिड-१९ विरोधात ह्या क्षेत्रातील व्यक्ती सैनिकांप्रमाणे लढत आहे त्यामुळे त्यांना ‘कोव्हिड योद्धे’ म्हणूनही संबोधिले जाते.            ज्याप्रमाणे कठीण काळात आपण पोलीस कर्मचारी, डॉक्टर, सफाई कर्मचारी इत्यादींचे महत्व जाणून घेतले आणि त्यांचा सन्मान केला आदर केला त्याच प्रमाणे या परिचारिका क्षेत्रा बद्दल या क्षेत्रात राहून आपली सेवा करणाऱ्या व्यक्तींबद्दलही आपण सन्मान आणि आदर व्यक्त केला पाहिजे. कारण या अत्यावश्यक सेवेतील प्रत्येक व्यक्ती आणि घटकांमुळे आपण या कोव्हिड-१९ विरोधातील युद्ध लवकर आणि शूरतेने जिंकणार आहोत याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. या अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना त्यांच्या कामाचा मोबदला किती भेटतो ? या पेक्षा समाजातील सर्व नागरिक आणि सर्व जग त्यांच्या सोबत उभं राहून त्यांना किती आदर आणि सन्मान बहाल करतो हे फार महत्वाचं आहे. म्हणूनच या परिचारिका क्षेत्रात व इतर अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या सर्व व्यक्तींना मानाचा मुजरा…

! डॉ.राहुल जवंजाळ, अध्यक्ष एन.जी.ओ. नर्सिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्य

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
इस्लामपूर येथील विजयसिंह मोहिते-पाटील विकास सेवा सोसायटीची निवडणुक बिनविरोध

इस्लामपूर येथील विजयसिंह मोहिते-पाटील विकास सेवा सोसायटीची निवडणुक बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In