दिव्यांग नेते पवनराज रामचंद्र बागल यांची पुणे जिल्हा दक्षिण दिव्यांग विकास आघाडी भाजपाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती; राजेशजी पांडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
पुणे, दि. १४ ऑगस्ट : दिव्यांग नेते पवनराज रामचंद्र बागल यांची भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा दक्षिण दिव्यांग विकास आघाडीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या सामाजिक, संघटनात्मक तसेच दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीचे अधिकृत नियुक्तीपत्र भाजपा संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे यांच्या हस्ते पवनराज बागल यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी बागल यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच खडकवासला ग्रामीण भाजपाचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री. बाजीराव भाऊसाहेब पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी संघटनात्मक पातळीवर अधिक जोमाने कार्य करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पवनराज बागल यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून भाजपा संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे, मा. आमदार रामभाऊ सातपुते, भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाळासाहेब हरपळे, सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण गायकवाड, पिंपरी-चिंचवड भाजपाचे ज्येष्ठ नेते रघुनाथ जवळकर तसेच माळशिरस भाजपा युवा मोर्चाचे ऋषिकेश गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठविणारे आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले दिव्यांग नेते पवनराज रामचंद्र बागल यांच्या या नियुक्तीमुळे दिव्यांग समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यांच्या नेतृत्वातून दिव्यांगांच्या विविध समस्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडल्या जातील आणि त्यांच्या हक्कांसाठीच्या लढ्याला अधिक संघटनात्मक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
पवनराज बागल यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील सामाजिक आणि संघटनात्मक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!







